भाजपच्या नागपूर शहर अध्यक्षपदी बंटी कुकडे, जाणून घ्या बंटी कुकडे यांचा राजकीय प्रवास

नागपूर शहर अध्यक्षपदी जितेंद्र उर्फ बंटी कुकडे यांची निवड झाली आहे. तरुण नेत्याकडे भाजपने शहराची धुरा सोपवली आहे.

भाजपच्या नागपूर शहर अध्यक्षपदी बंटी कुकडे, जाणून घ्या बंटी कुकडे यांचा राजकीय प्रवास
Follow us
| Updated on: Jul 25, 2023 | 8:14 PM

नागपूर : नागपूर हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा गृह जिल्हा. त्यामुळे नागपूरकडे संपूर्ण राज्याचा लक्ष लागून असतं. अशात आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. यात नागपूर शहराध्यक्ष म्हणून बंटी कुकडे यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाने अलीकडेच नव्या शहर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली. यात नागपूर शहर अध्यक्षपदी जितेंद्र उर्फ बंटी कुकडे यांची निवड झाली आहे. तरुण नेत्याकडे भाजपने शहराची धुरा सोपवली आहे. तर, येत्या मनपा निवडणुकीत भाजपच्या नगरसेवकांची संख्या 120 वर नेण्याचा संकल्प बंटी कुकडे यांनी केला आहे.

असा आहे राजकीय प्रवास

बंटी कुकडे हे सुरुवातीपासून संघ परिवारातील आहेत. आधी बजरंग दल शहराध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष झाले. त्यानंतर भाजप नगरसेवक असा बंटी कुकडे यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. तरुणांमध्ये बंटी कुकडे यांचा चांगला प्रभाव राहिलेला आहे. शिवाय ते चांगले वक्तेदेखील आहेत.

१२० नगरसेवक निवडून आणण्याचा संकल्प

महापालिकेत गेल्या निवडणुकीत भाजपचे 108 नगरसेवक निवडून आले होते. येत्या निवडणुकीत 120 नगरसेवक निवडून आणणार असा संकल्प बंटी कुकडे यांचा आहे. मात्र बंटी कुकडे ज्याप्रमाणे म्हणतात तेवढं त्यांच्यासमोरच आव्हान सोपं नाही. गेल्या मनपा निवडणुकीत निवडून आलेल्यांपैकी अर्धी संख्या महिला नगरसेवकांची होती.

काही नगरसेवकांवर नाराजी

यापैकी अनेक जण पाच वर्षे घराच्या बाहेरच पडले नाही, असा आरोप करण्यात आला होता. अनेक नगरसेवकांनी कामे केली नसल्याने त्यांच्या विरोधात नाराजी असल्याचेही भाजपच्या अंतर्गत सर्वेतून समोर आलं होतं. सध्याची राजकीय परिस्थिती आणि गेल्या पंधरा वर्षापासून सतत भाजप सत्तेत असल्याने अँटी इन कम्बस्नी कसे हाताळतात यावरच त्यांचा कस लागणार आहे.

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.