AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी सरण रचले, पूजा केली नंतर स्वतःला जाळून घेतले, नागपुरात वृद्ध व्यक्तीनं असं का केलं?

स्वतःचं सरण रचून पूजा केली. त्यानंतर वृद्धाने स्वतःला जाळून घेतलं. नागपूर जिल्ह्यातील किन्ही येथील वृद्धाच्या आत्महत्येनं खळबळ उडाली. धगधगत्या चितेत वृद्धाने स्वतःचा देह त्यागला. आत्माराम ठवकर असं या ज्येष्ठ व्यक्तीचं नाव आहे.

आधी सरण रचले, पूजा केली नंतर स्वतःला जाळून घेतले, नागपुरात वृद्ध व्यक्तीनं असं का केलं?
मृतक आत्माराम ठवकर, याच शरणावर त्यांनी स्वतःला जाळून घेतलं.Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Mar 02, 2022 | 9:40 AM
Share

नागपूर : जिल्ह्याच्या कुही तालुक्यातील किन्ही (Kinhi in Kuhi taluka) येथील एका वृध्द शेतकऱ्याने आपल्याच शेतात स्वत: सरण रचले. पूजा करून त्याठिकाणी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. आत्माराम मोतीराम ठवकर (Atmaram Motiram Thakkar) असं 80 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. ते वारकरी असून, धार्मिक प्रवृतीचे होते. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी रचलेल्या सरणाशेजारी त्यांनी विधीवत पूजाही केली. येथील भारत गॅस कंपनीचे मालक चिंधू ठवकर यांचे ते वडीत आहेत. शेतात असलेल्या गॅस गोडाऊनच्या शेजारी ( next to gas godown) त्यांचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला. आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मात्र, घरात सर्व सुख सोई असताना असा अघोरी विचार मनात का डोकावला, स्वत: सरण रचून आत्महत्या करण्याचे कारण काय ? यासारखे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

नेमकं कसं घडलं

शनिवारी किन्ही येथे रात्री मंडईचे आयोजन करण्यात आले होते. आत्माराम ठवकर हे येथे झाडीपट्टी नाटक बघायला गेले होते. नाटक पाहून झाल्यावर ते पहाटे त्यांच्या शेतात आले. येथे त्यांनी शेतातील लाकडे गोळा केली. स्वतःसाठी लाकडांचे सरण रचले. त्यावर तणस टाकली. सरणाची पूजा केली. त्यानंतर ते सरणावर चढले. स्वत:ला त्यांनी जाळून घेतले.

आत्माराम होते धार्मिक वृत्तीचे

सकाळी आत्माराम यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत होता. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वेलतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविला. याप्रकरणी वेलतूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नितेश डोर्लीकर करीत आहेत. आत्माराम हे धार्मिक वृत्तीचे होते. वारकरी संप्रदायाचे अनुयायी होते. वृद्धापकाळामुळे ते सतत आजारीही राहायचे. त्यांना कोणताही दुर्धर आजार नव्हता किंवा ते गंभीर आजारी पडले नाहीत. त्यांची आर्थिक परिस्थिती देखील चांगली होती. त्यांचे सर्व व्यवहार हे मुलगा बघत असतो. त्यांतरही त्यांनी हा टोकाचा निर्णय का घेतला, याचा पोलीस शोध घेत आहे.

पित्याची आत्महत्या, तीन दिवसांनी मुलीच्या बॅगमध्ये सुसाईड नोट सापडली, एकाला अटक

साहित्यिक राम शेवाळकर यांचा बालकीर्तनकार, शिक्षक ते प्राचार्य असा प्रवास माहीत आहे का?

नागपूर मनपाच्या कारभारणींनी घेतला आढावा, महिला व बालकल्याणाच्या योजना कुठपर्यंत?

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.