Nagpur | शासकीय व अनुदानित वसतिगृह, निवासी शाळाही सुरू, प्रवेश प्रक्रियेबद्दल समाज कल्याण विभागाने काय सांगितलं?

समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्यांच्याकरिता शासकीय वसतिगृहे सुरू करण्यात आलेली आहेत, असे समाजकल्याण विभागाच्या वतीनं कळविण्यात आले आहे.

Nagpur | शासकीय व अनुदानित वसतिगृह, निवासी शाळाही सुरू, प्रवेश प्रक्रियेबद्दल समाज कल्याण विभागाने काय सांगितलं?
नागपुरातील समाज कल्याण विभागाचे कार्यालय
| Updated on: Feb 11, 2022 | 4:30 AM

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये तसेच कोरोना बाधितांच्या संख्येत (The number of corona infestations) वाढ होऊ नये यासाठी शासनाने काही दिशानिर्देश दिले होते. त्या निर्देशानुसार नागपूर विभागातील (Nagpur Division) सर्व शासकीय व अनुदानित वसतिगृहे तसेच शासकीय निवास शाळा बंद करण्यात आल्या होत्या. सद्यस्थितीत कोविडची परिस्थिती आटोक्यात येत आहे. त्यामुळं सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहामध्ये व शासकीय निवासी शाळांमध्ये (Government residential schools) राहणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण होती. ही अडचण लक्षात घेवून कोविड-19 च्या नियमावलीला अनुसरून व आवश्यक काळजी घ्यावी. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार वसतिगृहे सुरू करण्यात आली आहेत. समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्यांच्याकरिता शासकीय वसतिगृहे सुरू करण्यात आलेली आहेत, असे समाजकल्याण विभागाच्या वतीनं कळविण्यात आले आहे.

प्रवेशासाठी अर्ज कुठे भरावा

नागपूर विभागीय स्तरावरील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथील शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतलेला आहे त्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांना वसतिगृहात पाठवावे. कोविड-19 च्या नियमाचे पालन करीत सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेली विभागातील सर्व शासकीय वसतिगृहे सुरू करण्यात आलेली आहेत. सन 2020-21या शैक्षणिक सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे. तेव्हा ज्या मुला-मुलींना शासकीय वसतिगृहात प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांनी अर्ज भरावे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय तसेच संबंधित शासकीय वसतिगृह येथे संपर्क साधावा. असे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी केले आहे.

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

2021-22 या शैक्षणिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना देय असलेल्या शिष्यवृत्तीच्या अनुषंगाने महाडीबीटी पोर्टलवर भारत सरकार पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्तीकरीता अर्ज करण्यास 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबत सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आदिवासी विकास उपायुक्त डी. एस. कुळमेथे यांनी कळविले आहे.

Nagpur | नितीन गडकरींच्या घरासमोर भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं काय?

अंकिता पिसुड्डे जळीतकांड : द्वितीय पुण्यस्मरण करून आई-वडील न्यायालयात, आज न्यायाची अपेक्षा

Video – Nagpur NMC | नगरसेवकांचा भूमिपूजनाचा सपाटा, नागपुरात नागरिकांचा विरोध, विक्की कुकरेजा यांच्याविरोधात नागरिक संतप्त