Video : मॅडम आमच्या शाळा केव्हापासून सुरू होणार?, गोंदियातील तिसरीत शिकणाऱ्या भूमीने लावला जिल्हाधिकाऱ्यांना फोन

गेल्या कित्तेक दिवसांपासून गोंदियातील वर्ग पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद आहेत. त्या सुरू करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या मुलीने जिल्हाधिकारी मॅडमला फोन लावला. एका आठवड्यात शाळा सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.

Video : मॅडम आमच्या शाळा केव्हापासून सुरू होणार?, गोंदियातील तिसरीत शिकणाऱ्या भूमीने लावला जिल्हाधिकाऱ्यांना फोन
जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना विद्यार्थिनी.
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 6:07 AM

गोंदिया : नागराज मंजुळे यांचा नाळ चित्रपट आपण पाहिला असणारच. या चित्रपटातील चैत्या नामक चिमुकला आपल्या आईला आई मला खेळायला जाऊ दे ना, असा हट्ट आईकडे करतो. मात्र गोंदियात काही उलट चित्र पाहायला मिळत आहे. गोंदिया जिल्हा परिषदेच्या (Gondia Zilla Parishad) भागी जिल्हा परिषदेच्या शाळेत तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने आपल्या आईकडे आई मला शाळेत जाऊ देना, असा हट्ट धरला. आई एकत नसल्यामुळे या चिमुकलीने गोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे (Collector Nayana Gunde) यांचा मोबाईल क्रमांक मिळवला. जिल्हाधिकाऱ्यांनाच फोन करीत शाळा सुरू करण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील तिच्या विनंतीला मान देत एका आठवड्यात शाळा (School in a week) सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.

आठवड्याभरात शाळा सुरू करण्याचे आश्वासन

गोंदिया जिल्हा परिषदेच्या भांगी जिल्हा परिषद शाळेत भूमी बंग शिकते. भूमी ही देवरी शहरातील उद्योगपती मिथुन बंग यांची मुलगी आहे. तिला दोन भावंड आहेत. ते खाजगी शाळेत शिक्षण घेतात. मात्र भूमी मागील दोन वर्षापासून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. मात्र कोरोना विषाणुमुळे वर्ग एक ते आठवीपर्यंतच्या शाळा मागील दोन वर्षांपासून बंद आहेत. दुसरीकडे ग्रामीण भागात इंटरनेट हव्या त्या प्रमाणात उपलब्ध नाही. ऑनलाईन शिक्षण घेताना येत असलेल्या अडचणी पाहता तसेच लगतच्या भंडारा जिल्ह्यात दोन दिवसांपासून वर्ग पहिली ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या. आपल्या जिल्ह्यात शाळा का सुरू होत नाही म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला. जिल्हाधिकाऱ्यांनीही तिला उतम प्रतिसाद देत एका आठवड्यात सुरु करू, असे आश्वासन दिले आहे.

घरी राहून कंटाळलेत विद्यार्थी

गेल्या कित्तेक दिवसांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळं विद्यार्थी घरी राहून कंटाळलेत. त्यामुळे शाळा केव्हापासून सुरू होईल, असं विद्यार्थी विचारत आहेत. पालकही विद्यार्थी घरी असल्यानं कंटाळलेत. विद्यार्थ्यांना आता शाळेचे वेध लागले आहेत. यामुळंच थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करेपर्यंत विद्यार्थी हिंमत करू लागले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी भूमीशी बोलून तिचे म्हणणे समजून घेतले. ही एका विद्यार्थिनीची प्रातिनिधीक प्रतिक्रीया आहे. बहुतेक सर्व विद्यार्थ्यांना शाळा सुरू व्हावी, असंच वाटतं.

Nagpur | नितीन गडकरींच्या घरासमोर भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं काय?

अंकिता पिसुड्डे जळीतकांड : द्वितीय पुण्यस्मरण करून आई-वडील न्यायालयात, आज न्यायाची अपेक्षा

Video – Nagpur NMC | नगरसेवकांचा भूमिपूजनाचा सपाटा, नागपुरात नागरिकांचा विरोध, विक्की कुकरेजा यांच्याविरोधात नागरिक संतप्त

Non Stop LIVE Update
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.