AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video – Nagpur NMC | नगरसेवकांचा भूमिपूजनाचा सपाटा, नागपुरात नागरिकांचा विरोध, विक्की कुकरेजा यांच्याविरोधात नागरिक संतप्त

अशाप्रकारे गोंधळ घालण्यात काही अर्थ नाही, असं कुकरेजा बोलत आहेत. परंतु, संतप्त नागरिक काहीही एकण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळं दोन्ही गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते.

Video - Nagpur NMC | नगरसेवकांचा भूमिपूजनाचा सपाटा, नागपुरात नागरिकांचा विरोध, विक्की कुकरेजा यांच्याविरोधात नागरिक संतप्त
नगरसेवक विक्की कुकरेजा
| Edited By: | Updated on: Feb 10, 2022 | 10:59 AM
Share

नागपूर : नागपुरातील भाजप नगरसेवक विक्की कुकरेजा (Corporator Vicky Kukreja) यांना नागरिकांनी चांगलाचा हिसका दाखवला. नगरसेवक विक्की कुकरेजा यांच्या अंगावर नागरिक धाऊन गेल्याचा व्हिडीओ व्हायरल (Video goes viral) झाला. संतप्त नागरिकांनी भूमिपूजन कार्यक्रम रोखल्याचा व्हिडीओ व्हायरल केलाय. विकासाची कामं केली नाही म्हणून प्रभागातील लोकांनी संताप व्यक्त केला. नाल्या आणि गडर लाईनचं (Nalya and Gadar line) काम केलं नाही, म्हणून लोक संतप्त झाले. पाच वर्षांत वस्तीत आले नसल्याचा कुकरेजा यांच्यावर आरोप लावला. नारा, समतानगर, श्रमिकनगर, देवनगर भागात भूमिपूजनाला गेले होते. गेल्या निवडणुकीत दिलेलं आश्वासन पूर्ण न केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. चर्चा करायची असेल तर माझ्या कार्यालयात या. अशाप्रकारे गोंधळ घालण्यात काही अर्थ नाही, असं कुकरेजा बोलत आहेत. परंतु, संतप्त नागरिक काहीही एकण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळं दोन्ही गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते. कार्यकर्त्यांनी कुकरेजा यांना बाजूला नेले. नागरिक आपली व्यस्था कुकरेजा यांच्याकडं मांडत होते.

डिप्टी सिग्नलमध्येही नगरसेवकाविरोधात रोष

दुसऱ्या एका घटनेत, डिप्टी सिग्नलचे नगरसेवक अनिल गेंडरे यांच्या कानशिलात एका महिलेने लगावल्याची चर्चा आहे. यामुळं काही काळ तणाव निर्माण झाला होता. प्रकरण पोलिसांपर्यंत गेले होते. पण, बदनामीच्या भीतीने तक्रार करण्यात आली नाही. पूर्व नागुरातील डिप्टी सिग्नल, संजयनगर या भागात कामगारांच्या वस्त्या आहे. या भागातील मलवाहिन्या तुंबणे, पाणीपुरवठा नियमित न होणे, अशा समस्या आहेत. नगरसेवकांकडे तक्रार करण्यास गेल्यानंतर ते या समस्यांची दखल घेत नाहीत. हा भाग नगरसेवक अनिल गेंडरे यांच्याकडे येतो.

नेमकं प्रकरण काय?

वॉर्डातील समस्यांबाबत अनिल गेंडरे यांच्याकडून नागरिकांना समाधानकारण उत्तर मिळत नव्हते. त्यामुळं संतापलेल्या महिलेने त्यांच्या कानशिलात लगावल्याची माहिती आहे. गेंडरे यांच्यावर हात उचलल्याने त्यांचे कार्यकर्तेही संतप्त झाले होते. दोन्हीकडून कळमना पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. परंतु, पोलिसांच्या मध्यस्तीनंतर दोन्ही पक्षांनी तक्रार मागे घेतली. या भागात अतिक्रमण असल्यानं कामे करताना अडचणी येत असल्यांच गेंडरे यांचं म्हणणंय.

नागपुरात सफाई मजुरांच्या वारसदारांना तोहफा, महापालिकेतर्फे नोकरीच्या नियुक्तीचे प्रमाणपत्र, किती जणांना लाभ?

नागपुरात अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; दिल्ली पासिंग कारमधून तस्करी, सिटच्या खाली ठेवला गांजा

Nagpur BJP | काँग्रेसच्या आंदोलनापूर्वीच भाजपचे कार्यकर्ते सज्ज, नागपुरात एकमेकांविरोधात घोषणाबाजी

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.