AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यांना काय कळणार धर्मासाठी त्याग काय असतो ते ?, चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला

अजितदादा, आपल्या स्वार्थासाठी सर्व ठिकाणी settlement (सेटलमेंट) करणाऱ्यांना काय कळणार धर्मासाठी त्याग काय असतो ते ? होय धर्मवीरच! छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना मानाचा मुजरा.

यांना काय कळणार धर्मासाठी त्याग काय असतो ते ?, चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला
चंद्रशेखर बावनकुळे
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Dec 31, 2022 | 4:41 PM
Share

नागपूर : अजितदादा, आपल्या स्वार्थासाठी सर्व ठिकाणी settlement करणाऱ्यांना काय कळणार धर्मासाठी त्याग काय असतो ते ? होय धर्मवीरच! छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना मानाचा मुजरा. असं ट्वीट भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. हा टोला त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना लगावला. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक होते. त्यांना धर्मवीर म्हणणे चुकीचे आहे, असे वक्तव्य केले. त्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांचा ट्विटरवरून समाचार घेतला आहे. स्वार्थासाठी सेटलमेंट करणाऱ्यांना काय कळणार धर्मासाठी त्याग काय असतो ते? संभाजी महाराज धर्मवीर होते असे ट्वीट त्यांनी केले आहे.

अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात नवा वाद सुरू झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. तर, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी ट्वीट करून अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे.

त्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना मानाचा मुजरा असे नमूद केले आहे. बावनकुळे यांनी ट्वीट करीत अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

अजितदादा, आपल्या स्वार्थासाठी सर्व ठिकाणी settlement (सेटलमेंट) करणाऱ्यांना काय कळणार धर्मासाठी त्याग काय असतो ते ? होय धर्मवीरच! छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना मानाचा मुजरा.

दोन दिवसांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांचा राज्यातील चंद्रपूर व संभाजीनगर येथे दौरा आहे. त्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष तयारीत प्रदेश कार्यालयात व्यस्त आहेत.

Follow Us
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत राहुल गांधींचा धक्कादायक दावा
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे भोपाळ शहरात तणाव, नेमकं प्रकरण काय?
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता परवाना नसेल तर शाळांमध्ये अन्न पुरवठा करता येणार नाही; 50 मीटर परिसरात...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन म्हणत केलं वादग्रस्त वक्तव्य!
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside...
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर
हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच अभिजीत दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट?दावा...
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट? दिल्लीतील हालचालीमागे... बड्या व्यक्तीच्या दाव्याने खळबळ
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... अभिजीत दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात...
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात घडामोडींना वेग