रासायनिक खतांच्या वाढत्या किंमती बाबत हस्तक्षेप करा अन्यथा केंद्र आणि राज्य सरकारविरोधात आंदोलन करणार;किसान सभा

| Updated on: Mar 21, 2022 | 8:36 PM

खतांच्या वाढत्या किंमती, अतिरिक्त ऊस, पीक विमा, वीज, जमीन, पेन्शन, घरकुल व रेशनच्या विविध प्रश्नांबाबत राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी किसान सभेतर्फे मुख्यमंत्री, कृषिमंत्री, आदिवासी विकास मंत्री व महसूल मंत्र्यांची भेट घेण्यात येणार आहे.

रासायनिक खतांच्या वाढत्या किंमती बाबत हस्तक्षेप करा अन्यथा केंद्र आणि राज्य सरकारविरोधात आंदोलन करणार;किसान सभा
kisan sabha
Image Credit source: TV9
Follow us on

नागपूरः युक्रेन-रशिया युद्धाचा (Russia-Ukraine War) परिणाम म्हणून रासायनिक खतांचे (Chemical fertilizer) भाव वाढू लागले आहेत. युद्ध असेच सुरू राहिले तर खतांचे भाव अक्षरशः आवाक्याबाहेर जातील अशी परिस्थिती आहे. शेतीचा वाढत असलेला उत्पादन खर्च (Production costs) यामुळे आणखी वाढणार आहे. शेतीमालाच्या उत्पादनावरही याचा अत्यंत विपरित परिणाम होणार आहे. केंद्र व राज्य सरकारने ही बाब लक्षात घेता याबाबत तातडीने हस्तक्षेप करावा व वाढत्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय योजना कराव्या, रासायनिक खतांच्या कच्च्या मालाची आयात सुलभ होईल यासाठी प्रयत्न करावेत, प्रसंगी अनुदान वाढवावे, विविध कर कमी करावेत. खतांचे दर कोणत्याही परिस्थितीत कमी करावेत अशी मागणी किसान सभेने केली आहे.

केंद्र व राज्य सरकारने याबाबत उपाय योजना केल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा नागपूर येथे झालेल्या किसान सभेच्या राज्य बैठकीमध्ये देण्यात आला आहे.

नागपूर येथे झालेल्या या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. खतांच्या वाढत्या किंमती, अतिरिक्त ऊस, पीक विमा, वीज, जमीन, पेन्शन, घरकुल व रेशनच्या विविध प्रश्नांबाबत राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी किसान सभेतर्फे मुख्यमंत्री, कृषिमंत्री, आदिवासी विकास मंत्री व महसूल मंत्र्यांची भेट घेण्यात येणार आहे. या सर्व प्रश्नांबाबत चर्चा करण्यात येणार असून चर्चेतून प्रश्न न सुटल्यास संपूर्ण तयारीनिशी प्रसंगी तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. बैठकीमध्ये याबाबतचे सविस्तर नियोजन करण्यात आले आहे.

या बैठकीसाठी डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावीत, किसन गुजर, डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, अर्जुन आडे, सिद्धपा कलशेट्टी, दादा रायपुरे, सुनिल मालुसरे, माणिक अवघडे, उदय नारकर, यशवंत झाडे, उद्धव पौळ, सुभाष चौधरी, सावळीराम पवार व 24 जिल्ह्यांतून प्रतिनिधी यावेळी हजर होते.

संबंधित बातम्या 

China Plane Crash : विमान दुर्घटनेआधी नेमकं काय घडलं? जाणून घ्या 10 मोठ्या घडामोडी

Sangli Accident: सांगलीत काळीज चर्रर्र करणारा अपघात, 7 कि.मी. पर्यंत चिमुकल्याला फरफटत नेलं, पब्लिक संतप्त

एक रकमी FRP देता येणार नाही, अप्पर सचिवांचं Raju Shetti यांच्या पत्राला उत्तर