ओबीसी विरुद्ध ओबीसी निवडणूक, तरीही नागपूर जिल्हापरिषदेत महाविकास आघाडीचा कस लागणार; वाचा काय आहे समीकरण?

| Updated on: Sep 14, 2021 | 2:56 PM

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. (obc reservation)

ओबीसी विरुद्ध ओबीसी निवडणूक, तरीही नागपूर जिल्हापरिषदेत महाविकास आघाडीचा कस लागणार; वाचा काय आहे समीकरण?
पालघरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती पोट निवडणुकीत 29 जागांसाठी मतदान संपन्न
Follow us on

नागपूर: राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विशेष म्हणजे सर्वच राजकीय पक्षाने ओबीसींच्या जागेवर ओबीसींचाच उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याने राज्यात सर्वत्र ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी लढत होण्याचे चिन्हं आहेत. मात्र ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी लढत झाली तरी नागपूरमध्ये मात्र महाविकास आघाडीचा कस लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. (is maha vikas aghadi will win zila parishad elections in nagpur?)

राज्य निवडणूक आयोगाने नागपूरसह अकोला, वाशीम, नंदूरबार आणि धुळे या पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने रद्द झालेल्या नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 तर पंचायत समितीच्या 31 जागांवरही पोटणीवडणूक होणार आहे. ओबासी आरक्षणाशिवाय ही निवडणूक होत आहे. पण काँग्रेस आणि भाजपने ओबीसी उमेदवार देण्याच्या घोषणा केल्याने ही निवडणूक ओबीसी विरुद्ध ओबीसी होण्याची दाट शक्यता आहे.

आव्हान पेलणं कठिण

ओबीसींचं राजकीय आरक्षण गेल्यानंतर ही निवडणूक होत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी आघाडीचा या निवडणूकीत चांगलाच कस लागणार आहे. राज्यात तीन पक्षाचं सरकार असल्याने महाविकास आघाडीला आपली एकत्रित ताकद दाखवावी लागणार आहे. जिल्हा परिषद निवडणूक ही मिनी विेधानसभा समजली जाते. त्यामुळे महाविकास आघाडीला ग्रामीण सत्ता ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. भाजपचं नागपूरमध्ये वर्चस्व असल्याने महाविकास आघाडी हे आव्हान पेलणं कठिण जाणार असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

गडकरी, फडणवीस, बावनकुळेंची प्रतिष्ठा पणाला

तर नागपूर हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंचा जिल्हा असल्याने भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. डिसेंबर 2019 च्या निवडणुकीत इतर मागासवर्गीयांसाठी राखीव जागांवरून निवडून आलेल्या जिल्हा परिषदेच्या 16 आणि पंचायत समित्यांच्या 31 सदस्यांचं सदस्यत्व निवडणूक आयोगाने रद्द केलं होतं. त्या रिक्त जागांसाठी 5 ॲाक्टोबर रोजी पोटनिवडणुका होणार आहे.

ओबीसींच्या नाराजीचा फटका?

ओबीसी आरक्षण संपुष्टात आल्याने आता खुल्या प्रवर्गातून निवडून येण्यासाठी ओबीसी उमेदवारांचा चांगलाच कस लागणार आहे. पण भाजप आणि काँग्रेसने या जागांवर ओबीसी उमेदवार देण्याची घोषणा केल्याने ही पोटणीवडणूक ओबीसी विरुद्ध ओबीसी होईल. चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपने विधानसभेची तिकीट नाकारली होती. त्यानंतर विधानपरिषदेवर पाठवून बावनकुळेंचं पुनर्वसनही करण्यात आलेलं नाही. त्यामुळे ओबीसी समाज भाजपवर नाराज आहे. त्याचा फटका भाजपला बसेल असं जाणकारांना वाटतंय. (is maha vikas aghadi will win zila parishad elections in nagpur?)

या जिल्हा परिषद सर्कलमध्ये पोट निवडणूक

तालुका जिल्हा – परिषद सर्कल

नरखेड-    सावरगाव, भिष्णूर
काटोल-    येनवा, पारडसिंगा
सावनेर-    वाकोडी, केळवद
पारशिवनी- करंभाड
रामटेक-    बोथिया
मौदा-        अरोली
कामठी-     गुमथळा, वडोदा
नागपूर-    गोधनी रेल्वे
हिंगणा-     निलडोह,
डिगडोह-   इसासनी
कुही-         राजोला

 

संबंधित बातम्या:

ओबीसी आरक्षणासाठी उद्या राज्यभर आंदोलन, एक हजार ठिकाणी निदर्शने; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा

राज्य सरकारचीही ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुकीला सामोरे जाण्याची मानसिकता?; भुजबळ नेमकं काय म्हणाले?

VIDEO : आमदार, मंत्री ते मुख्यमंत्री सगळेच टेन्शनमध्ये, नितीन गडकरींच्या कोपरखळ्या

(is maha vikas aghadi will win zila parishad elections in nagpur?)