ओबीसी आरक्षण बैठकीला वांझोटी म्हणणाऱ्यांचे तोंड वांझोटे; विजय वडेट्टीवार संतापले

| Updated on: Aug 28, 2021 | 1:10 PM

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीवर काहींनी टीका करताना वांझोटी बैठक असा उल्लेख केला. (maharashtra government call final meeting for obc reservation on friday, says vijay wadettiwar)

ओबीसी आरक्षण बैठकीला वांझोटी म्हणणाऱ्यांचे तोंड वांझोटे; विजय वडेट्टीवार संतापले
मंत्री विजय वडेट्टीवार
Follow us on

नागपूर: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीवर काहींनी टीका करताना वांझोटी बैठक असा उल्लेख केला. त्याचा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी समाचार घेतला आहे. ओबीसी आरक्षण बैठकीला वांझोटी बैठक म्हणणाऱ्यांचे तोंड वांझोटे आहे, असा संताप विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. (maharashtra government call final meeting for obc reservation on friday, says vijay wadettiwar)

विजय वडेट्टीवार यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना ही टीका केली. ओबीसी आरक्षणाबाबत काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीला वांझोटी म्हणणं चुकीचं आहे. त्या वांझोट्या बैठकीला सर्व पक्षीय नेते होते. ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत निवडणुका घेऊ नका असे सर्व पक्षांचे म्हणणे होते. महत्वाच्या बैठकीला वांझोटी बैठक म्हणाऱ्यांचं तोंडच वांझोटं आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.

शुक्रवारी अंतिम बैठक

लॉ अँड ज्युडीशियरीचे काही मुद्दे समोर आले आहेत. इंपेरिकल डेटा समोर आल्यानंतर काही जिल्ह्यात आरक्षण शून्य होणार आहे. काही जिल्ह्यात आरक्षण आताच्या तुलनेत कमी होईल, तर काही जिल्ह्यात आताच्या तुलनेत वाढणार आहे. त्यामुळे या सर्व मुद्द्यांवर लॉ अँड ज्युडिशियरीचे मत जाणून घेणे आवश्यक आहे. पुढच्या शुक्रवारला या बाबतीतली दुसरी बैठक होईल. ती अंतिम बैठक असणार आहे, निर्णय पुढील शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत होईल, असं त्यांनी सांगितलं.

आरक्षण मिळणे महत्त्वाचे

मराठा आरक्षणासंदर्भात आतापर्यंत दहा बैठका झाल्या आहेत. उलट ओबीसी आरक्षणासाठी दोन-तीनच बैठका झाल्या आहेत. कोणाच्या किती बैठका झाल्या हे महत्त्वाचे नसून आरक्षण मिळणे महत्त्वाचा आहे, असं ते म्हणाले.

त्यांची नाराजी दूर करू

काँग्रेस पक्ष वेगाने वाढत आहे. त्यामुळे पदं मिळाली ते खूश आहेत आणि ज्यांना पदं मिळाली नाही ते नाराज आहेत. पक्षश्रेष्ठी सर्वांची नाराजी दूर करतील, असं ते म्हणाले. सोलापुरला भटक्या समाजाचा ऐतिहासिक मेळावा होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. (maharashtra government call final meeting for obc reservation on friday, says vijay wadettiwar)

 

संबंधित बातम्या:

सांगू का आता पोलिसांना उचलायला, पुन्हा म्हणाल दादा लय कडक आहे, कॅमेरामनवर अजित पवारांची टोलेबाजी

अजून एखादा कार्यक्रम करेक्ट करू; संजय राऊतांचा राणेंना अप्रत्यक्ष इशारा

राज ठाकरे शेतकऱ्यांना न्याय देतील, सदाभाऊ खोत यांना विश्वास, अमित ठाकरेंची भेट

(maharashtra government call final meeting for obc reservation on friday, says vijay wadettiwar)