राज ठाकरे शेतकऱ्यांना न्याय देतील, सदाभाऊ खोत यांना विश्वास, अमित ठाकरेंची भेट

राजपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) चार दिवसीय नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत आज सलग दुसऱ्या दिवशी मनसे (MNS) कार्यकर्त्यांच्या बैठकीचं आयोजन होत आहे.

राज ठाकरे शेतकऱ्यांना न्याय देतील, सदाभाऊ खोत यांना विश्वास, अमित ठाकरेंची भेट
Sadabhau Khot Meet Amit Thackeray at Nashik
Follow us
| Updated on: Aug 28, 2021 | 12:34 PM

नाशिक : राजपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) चार दिवसीय नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत आज सलग दुसऱ्या दिवशी मनसे (MNS) कार्यकर्त्यांच्या बैठकीचं आयोजन होत आहे. अमित ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. मनसेच्या बैठकीपूर्वी आज अमित ठाकरे आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांची भेट झाली.

सदाभाऊ खोत यांनी अमित ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. राज ठाकरे शेतकऱयांना न्याय देतील असा विश्वास यावेळी सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला. अमित ठाकरे आणि सदाभाऊ खोत दोघेही सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत.  अमित ठाकरे आणि सदाभाऊ खोत यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मात्र जोरदार चर्चा आहे.

अमित ठाकरेंच्या भेटीगाठी

दरम्यान आज नाशिकमधील मनसे पदाधिकारी अनंता सूर्यवंशी यांच्या वडिलांचे निधन झाले. याची माहिती मिळताच अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांनी सूर्यवंशी कुटुंबाच्या घरी जाऊन भेट घेत, पार्थिवाचं दर्शन घेतलं आणि कुटुंबियांच सांत्वन केलं.

कोणतंही सरकार कायम नसतं : अमित टाकरे

कोणतंही सरकार कायम नसतं, लोक बघत असतात कोण काम करतंय आणि कोण नाही. लोक सूज्ञ असतात, असं म्हणत अमित ठाकरे यांनी नाशिकच्या मैदानात पहिली गर्जना केली. एकाच ठिकाणी सगळ्यांना भेटणं अवघड होतं. अनेकांना शाखाध्यक्ष होण्याची इच्छा आहे. अनेक जण असल्याने तीन ठिकाणं बैठकी आहेत. शाखा अध्यक्ष हा पक्षाचा कणा आहे. राजसाहेब सगळीकडे जाऊ शकत नाहीत, म्हणून शाखा अध्यक्ष महत्त्वाचा आहे. यासाठी प्रभाग अध्यक्ष हे पद नाही. शाखाध्यक्ष महत्वाचा आहे. तुम्ही आम्हाला सांगितलं महिन्यातून येत जा म्हणून आम्ही तयारीला लागलोय, असं अमित ठाकरे म्हणाले.

संबंधित बातम्या 

Amit Thackeray Uncut | कोणतंही सरकार कायम नसतं, नाशिकच्या मैदानात अमित ठाकरेंची पहिली गर्जना

दहीहंडी साजरी करणारच, आम्ही अस्वल, आमच्यावर खूप केस; संदीप देशपांडे आक्रमक

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.