AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur | कोमात असताना प्रसूती, मेंदूवर शस्त्रक्रिया! डॉक्टरांनी वाचविले आईसह बाळाचे प्राण

भंडारा येथील नऊ महिन्याच्या गरोदर महिलेचा अपघात झाला. त्यानंतर ती कोमात गेली. मेंदूमध्ये रक्ताची मोठी गाठ तयार झाली होती. ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत होते. स्त्रीरोगतज्ज्ञांच्या चमूने रुग्णाची प्रसूती करून त्यानंतर मेंदूवर शस्त्रक्रिया केली. आई व नवजात बाळाला डॉक्टरांनी जीवदान दिले.

Nagpur | कोमात असताना प्रसूती, मेंदूवर शस्त्रक्रिया! डॉक्टरांनी वाचविले आईसह बाळाचे प्राण
नागपुरातील शुअरटेक रुग्णालयाची रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची चमू. Image Credit source: tv 9
| Updated on: Mar 02, 2022 | 10:23 AM
Share

नागपूर : नऊ महिन्याची गरोदर महिला पतीसोबत डॉक्टरांकडे जात होती. अचानक अपघात झाला. यात ती गंभीर जखमी झाली. भंडारा येथे प्राथमिक उपचार (First Aid at Bhandara) केले. त्यानंतर नागपुरात शुअरटेक हॉस्पिटलमध्ये (Shuertech Hospital at Nagpur) पाठविण्यात आले. आयसीयू डायरेक्टर डॉ. निर्मल जयस्वाल (Dr. Nirmal Jaiswal ) यांनी रुग्णाची तपासणी केली. तिला श्‍वास घेण्यास त्रास होत होता. ऑक्सिजनचे प्रमाणही कमी होते. मेंदूच्या कार्यात अडथळा निर्माण होत होता. शिवाय अन्य अवयव निकामी होण्याचा धोका होता. सीटी स्कॅन करण्यात आले. मेंदूमध्ये रक्त जमा झाल्याने गाठ झाली होती. मेंदूवर सुज आली होती.

अशा होत्या अडचणी

गरोदरपणात झालेला अपघात, मेंदूला इजा, श्‍वास घेताना होणारा त्रास अशा अनेक अडचणी होत्या. कमी होणारा ऑक्सिजन अशी जोखीम होती. अशा परिस्थितीमध्ये महिलेची प्रसूती करण्यात आली. प्रसूतीनंतर तिच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करून गाठ काढण्यात आली. प्रसूतीनंतर पाच मिनिटांहून अधिक काळ लोटला तरी बाळ रडला नाही. तर त्याच्या जीवाला बहुधा धोका निर्माण होतो. बाळ जन्मल्यावर रडला नाही. पण बालरोगतज्ज्ञांनी विशेष प्रयत्न केले. त्यामुळं बाळाच्या जीवाचे रक्षण झाले.

यांनी केले शस्त्रक्रिया

या रुग्णाच्या मेंदूवर शस्त्रक्रिया न्यूरोसर्जन डॉ. आलोक उमरेडकर यांनी केली. प्रसूतीसाठी डॉ. श्‍वेताली देशमुख, जन्मलेल्या बाळावरील उपचारासाठी डॉ. अर्चना जयस्वाल, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. भावेश बरडे व सुंगणीतज्ज्ञ डॉ. रवी मुंदडा यांच्या चमूने रुग्णावर उपयार केले. या रुग्ण महिलेच्या घरच्यांनी डॉक्टरांवर विश्‍वास ठेवला. तातडीने परवानगी दिली. उपचारांचा गोल्डन अवर मिळाला. स्पेशालिटीच्या तज्ज्ञांनी एकत्र मिळून उपचार केले. त्यामुळं रुग्णाला जीवदान मिळाले, असे डॉ. जयस्वाल यांनी सांगितलं.

पित्याची आत्महत्या, तीन दिवसांनी मुलीच्या बॅगमध्ये सुसाईड नोट सापडली, एकाला अटक

साहित्यिक राम शेवाळकर यांचा बालकीर्तनकार, शिक्षक ते प्राचार्य असा प्रवास माहीत आहे का?

नागपूर मनपाच्या कारभारणींनी घेतला आढावा, महिला व बालकल्याणाच्या योजना कुठपर्यंत?

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.