AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“आमच्या सरकारने सांगितले आहे की एकही मुलगा असला तरी शाळा बंद होणार नाही”; देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना उत्तर दिलं…

आपण शिक्षक भरती सुरू केली तर काही लोकांनी अफवा उडविला की पट संख्या कमी असलेल्या शाळा बंद होणार पण आम्ही शाळा बंद करणार नाही म्हणत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

आमच्या सरकारने सांगितले आहे की एकही मुलगा असला तरी शाळा बंद होणार नाही; देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना उत्तर दिलं...
| Updated on: Jan 15, 2023 | 5:38 PM
Share

मुंबईः शिक्षक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमुळे राज्यातील वातावरण प्रचंड तापले आहे. नाशिकच्या सत्यजित तांबे यांच्या राजकीय भूमिकेमुळे भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये (Congress) जोरदार खडाजंगी सुरू असतानाच उपमुख्यमंत्री यांनी नागो गाणार (Nago Ganar) यांना उमेदवारी घोषित करीत विरोधकांवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नागो गाणार यांना उमेदवारी घोषित केली असून भाजप आणि मित्र परिवाराचे त्यांनी समर्थन राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

बारा वर्षे नागो गाणार आमदार राहिले आहेत पण त्यांच्यामध्ये कोणताही बदल झाला नसल्याचे सांगत कोणीही भ्रष्ट्राचाराचा आरोप त्यांच्यावर करू शकत नाही या शब्दात त्यांनी त्यांचा गौरव केला आहे.

नागो गाणार हे सातत्याने त्यांचे प्रश्न लावून धरतात तर काही शिक्षक आमदार हे शिक्षकांचे प्रश्न सोडून बिल्डरांचे प्रश्न लावून धरतात असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे. तर गाणार हे फक्त शिक्षकांचे प्रश्न मांडत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधताना त्यांनी म्हटले की, अडीच वर्षे उद्धवजी ठाकरे यांच्या सरकारने शिक्षकांसाठी एकही निर्णय घेतला नाही.

राज्यामध्ये एकही शिक्षक भरती केली नाही. आमच्या सरकारने सांगितले आहे की एकही मुलगा असला तरी शाळा बंद होणार नाहीत असा शब्द त्यांनी यावेळी दिला आहे.

भाजपने या योजना बंद केल्या आहेत असं वातावरण विरोधकांकडून तयार केले जात आहे अशी जोरदार टीकाही त्यांनी केली आहे.

नागो गाणार यांच्या कामाविषयी गौरवोद्गगार काढताना ते म्हणाले की, व्रतस्थपणे काम करणारे नेते फार कमी असतात त्यापैकी एक गाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गेली अनेक वर्षे ही जागा शिक्षक परिषद वाढवते आणि भाजप त्यांना समर्थन देते यावर्षी सुद्धा आपण त्यांना समर्थन दिले आहे.

नागो गाणार 12 वर्ष आमदार राहिले आहेत. तरीही त्यांच्यामध्ये काडीचाही बदल झाला नाही. ते जमिनीवरच आहेत हे महत्त्वाचं आहे.

काही लोक आमदार होताच त्यांची विमान हवेत उडतात मात्र गाणार हे शिक्षकांच्या प्रश्नासाठी भिडतात आणि प्रश्न सुटेपर्यंत लढत राहतात अशा शब्दात त्यांनी त्यांचा गौरव केला आहे.

शिक्षण संस्थांपकावर बोलतानाही त्यांनी नागो गाणार यांच्या कामाचे कौतूक केले आहे. काही संस्था चालक गाणार यांच्यावर नाराज होतात मात्र ते कधी वैमनस्यातून त्याकडे बघत नाही तर शिक्षकांच्या प्रश्नसाठी ते कायमच लढत राहतात असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कायम विना अनुदानित शाळांचा प्रश्न काँग्रेस-राष्ट्रवादीने निर्माण केला होता. आम्ही अश्वासन दिले नव्हतं पण आम्ही ते काम करून दाखविले आहे.

येत्या काळात आपण अनुदानाचे सगळे ठरलेले टप्पे पूर्ण करणार असून मागील सरकारने शिक्षकांच्या बाजूने कुठलेही निर्णय घेतले नाही असं सांगत ठाकरे सरकारवर त्यांनी जोरदार हल्लाबोल चढविला आहे.

आपण शिक्षक भरती सुरू केली तर काही लोकांनी अफवा उडविला की पट संख्या कमी असलेल्या शाळा बंद होणार पण आम्ही शाळा बंद करणार नाही म्हणत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुनी पेन्शन योजनेववरूनही त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या पेन्शन योजनेवर बोलताना म्हणाले की, काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची मला लाज वाटते ते जणू दाखवतात की. जुनी पेन्शन योजना भाजपने बंद केली आहे. मात्र तसे नाही.

पेन्शन खर्च वाढणार असल्याने विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे असं मी सांगितलं होते. काही राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा ठरविले असले तरी ती अजून दिली नाही.

जुन्या पेन्शनचा वाद असो की कुठलाही तो प्रश्न सोडविण्याची ताकत फक्त आपल्यात आहे असा विश्वास व्यक्त करून त्यांनी विरोधखांवर जोरदार निशाणा साधला आहे.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.