AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! ठाकरे गटानंतर आता आणखी एक मोठा पक्ष फुटला, ज्याची भिती होती शेवटी तेच घडलं, राजकारणात मोठा भूकंप

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, सध्या राजकारणात अनेक पक्षांमध्ये मोठी फूट पडत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. नुकतीच शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली होती, त्यानंतर आता मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! ठाकरे गटानंतर आता आणखी एक मोठा पक्ष फुटला, ज्याची भिती होती शेवटी तेच घडलं, राजकारणात मोठा भूकंप
vijay thalapathyImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 02, 2026 | 6:49 PM
Share

सध्या सगळीकडे फोडा फोडीचं राजकारण सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. राज्यात उद्धव ठाकरे यांना दोन मोठे धक्के बसले आहेत. एक म्हणजे एकाचवेळी 6 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली, त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे सचिन आहिर यांनी देखील उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. शिवसेना ठाकरे गटात फूट पडली आहे, ऑपरेशन टायगरनंतर आता राज्यात दबक्या आवाजात ऑपरेशन तुतारीची देखील चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रात या सर्व घडामोडी घडत असताना तामिळनाडूनमधून मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री विजय थलपती यांचा पक्ष असलेल्या टीव्हीकेने तामिळनाडूत विरोधी पक्ष असलेल्या ऑल इंडिया अन्ना द्रविड मुनेत्र कळघम (AIADMK) ला मोठा धक्का दिला आहे.

तामिळनाडूमध्ये एआयएडीएमकेमध्ये मोठी फूट पडली आहे. एआयएडीएमकेचे नेते आणि माजी मंत्री डॉ. सी. विजयभास्कर, एम. आर. विजयभास्कर आणि एम. एस. एम आनंद या तिघांनी आपल्या समर्थकांसह टीव्हीकेमध्ये प्रवेश केला आहे. हा विरोधी पक्षासाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. गुरूवारी मामल्लापुरम येथे आयोजित एका कार्यक्रमामध्ये या तीन नेत्यांनी टीव्हीकेमध्ये प्रवेश केला आहे. टीव्हीकेचे महासचिव एन. आनंद यांच्या उपस्थितीमध्ये या तीन नेत्यांनी टीव्हीकेमध्ये प्रवेश केला आहे. या नेत्यांनी टीव्हीकेमध्ये प्रवेश करताच विजय थलपती यांच्या कार्याचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

या तीन बड्या नेत्याच्या पक्षप्रवेशामुळे टीव्हीके आता आणखी मजबूत झालं आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये टीव्हीके सर्वात मोठा पक्ष ठरला होता. टीव्हीकेला राज्यात 107 जागा मिळाल्या होत्या, परंतु तरी देखील पक्षाकडे स्पष्ट बहुमत नव्हतं. अखेर थलपती विजय यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापन केली. विजय यांचं सरकार म्हणजे तामिळनाडूमधील दोन्ही प्रस्थापित पक्षांसाठी मोठा धक्का देणारं आहे. त्यातच आता एआयएडीएमकेमध्ये मोठी फूट पडली आहे. थलपती विजय यांचे आमदार फोडून सरकार अल्पमतात आणण्याचा प्रयत्न सुरू होता, अशी माहिती समोर आली होती, मात्र आता थलपती विजय यांनी तामिळनाडूमध्ये मोठा डाव टाकला आहे.

Follow Us
29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? जरांगे पाटलांनी दिली सर्वात मोठी...
29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? जरांगे पाटलांनी दिली सर्वात मोठी अपडेट
आरोग्यमंत्री आबिटकरांचा मृत बालकांच्या पालकांशी संवाद, समिती स्थापन...
Amravati : आरोग्यमंत्री आबिटकरांचा मृत बालकांच्या पालकांशी संवाद, समिती स्थापन करण्याची घोषणा
मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकार सकारात्मक? विखे पाटलांनी दिला सर्वात...
मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकारा मोठा निर्णय? विखे पाटलांनी दिला सर्वात मोठा संकेत, दोन-तीन दिवसांत...
सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत...केंद्र सरकारचं
सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत...केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं!
रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; 19 जणांवर गुन्हा दाखल!
रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; सुषमा अंधारेंसह 19 जणांवर गुन्हा दाखल! लवकरच...
दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय...
Sugar Price Today : दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय...
पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकाराली, नेमकं..
पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकाराली, नेमकं कारण काय?
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी..
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? जरांगेंसोबत चर्चा
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? मनोज जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क...