Prashant Bamb : प्रशांत बंब यांचं मानसिक संतुलन बिघडलंय का? भाजपा समर्थित आमदाराचा सवाल, कारवाईचीही मागणी

| Updated on: Sep 02, 2022 | 10:47 AM

एका सरकारी शाळेतील शिक्षकाशी बोलतानाची एक क्लिप व्हायरल झाली होती. संबंधित शिक्षक आमदार बंब यांना सरकारी शाळेत कशी दुरवस्था आहे, कोणकोणत्या समस्या आहेत, हे सांगत आहे. त्यावर आमदार बंब त्यांना आरेरावीची भाषा वापरताना दिसत आहेत.

Prashant Bamb : प्रशांत बंब यांचं मानसिक संतुलन बिघडलंय का? भाजपा समर्थित आमदाराचा सवाल, कारवाईचीही मागणी
प्रशांत बंब/नागो गाणार
Image Credit source: tv9
Follow us on

नागपूर : भाजपा आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे का, असा सवाल भाजपा समर्थित शिक्षक आमदार नागो गाणार (Nago Ganar) यांनी उपस्थित केला आहे. शिक्षकाची असभ्य भाषा वापरल्यामुळे प्रशांत बंब सध्या चर्चेत आले आहेत. शाळेच्या समस्या मांडल्यानंतर आमदार प्रशांत बंब यांना एक शिक्षक जाब विचारत आहे, तर संबंधित शिक्षकाला प्रशांत बंब अरेरावी करत असल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर लगेच एका महिला शिक्षकाशी हुज्जत घालतानाचीदेखील ऑडिओ क्लिप (Audio Clip) समोर आली होती. त्यानंतर प्रशांत बंब यांच्याकडून पोलिसांत तक्रारही करण्यात आली होती. या सर्व प्रकरणावर प्रशांत बंब यांनी आपली बाजू मांडत काहीही चूक नसल्याचे म्हटले होते. मात्र भाजपा समर्थित आमदार नागो गाणार यांनी प्रशांत बंब यांच्यावर टीका केली आहे.

‘हे भाजपाचे धोरणात्मक मत आहे का?’

प्रशांत बंब शिक्षकांचा अपमान करत आहेत, म्हणजे ते स्वत:च्या आई-वडिलांचाही अपमान करत असतील. प्रशांत बंब यांचे मत हे भाजपाचे धोरणात्मक मत आहे का, असा सवाल करत गाणार यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे. प्रशांत बंब यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे गाणार म्हणाले.

‘पक्षाने कारवाई करावी’

शिक्षकांचा अपमान सहन केला जाणार नाही, अशी भूमिका गाणार यांनी मांडली आहे. प्रशांत बंब यांच्या वक्तव्याचा निषेध करावा तसेच पक्षाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी गाणार यांनी भाजपाकडे केली आहे.

हे सुद्धा वाचा

नागो गाणार आक्रमक

काय म्हणाले होते प्रशांत बंब?

एका सरकारी शाळेतील शिक्षकाशी बोलतानाची एक क्लिप व्हायरल झाली होती. संबंधित शिक्षक आमदार बंब यांना सरकारी शाळेत कशी दुरवस्था आहे, कोणकोणत्या समस्या आहेत, हे सांगत आहे. त्यावर आमदार बंब त्यांना आरेरावीची भाषा वापरताना दिसत आहेत. मी काय बोलवे हे तुम्ही मला सांगू नका, असे ते या शिक्षकाला बोलत असल्याचे दिसत आहे.

‘शाळेतील दुरवस्था बघून तुम्हाला लाज वाटत नाही?’

या शिक्षकाने आमदारांसमोर आपल्या समस्या मांडल्या आहेत. त्यावर शाळेतील दुरवस्था बघून तुम्हाला लाज वाटत नाही का, असा प्रतिसवाल बंब करत आहेत. संबंधित शिक्षकही बंब यांना तुम्हाला या सगळ्याची लाज वाटायला हवी, असे म्हणत असल्याची क्लिप व्हायरल झाली होती. नंतर महिला शिक्षकासोबतची क्लिपही व्हायरल झाली होती.