जिहादींचा राज्य पेटवण्याचा प्रयत्न, विश्व हिंदू परिषदेचा आरोप, दोषींवर कारवाई करण्याची मागणी

| Updated on: Nov 15, 2021 | 9:22 AM

नागपूर : त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्थ अमरावती पेटले. हा जिहादींचे महाराष्ट्र पेटविण्याचा प्रयत्न आहे, असे मत विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी व्यक्त केले. विश्व हिंदू परिषदेतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते.

जिहादींचा राज्य पेटवण्याचा प्रयत्न, विश्व हिंदू परिषदेचा आरोप, दोषींवर कारवाई करण्याची मागणी
नागपुरात पत्रकार परिषदेत बोलताना विहिंपचे मिलिंद परांडे व इतर.
Follow us on

नागपूर : त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्थ अमरावती पेटले. अमरावतीत दगडफेक करण्यात आली. पोलीस, जिल्हा प्रशासनाचे नुकसान झाले. हा जिहादींचा महाराष्ट्र पेटविण्याचा प्रयत्न आहे, असे मत विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी व्यक्त केले. विश्व हिंदू परिषदेतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते.

मोर्च्याला सहा संघटनांचा पाठिंबा

त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्त रजा अकॅडमीच्या नेतृत्त्वात अमरावती, मालेगाव, नांदेड या शहरांत मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्याला अन्य सहा संघटनांचा पाठिंबा होता. महाराष्ट्र पेटविण्यासाठी हा सुनियोजित व धर्मांध जिहादींचा कट होता, असा आरोप मिलिंद परांडे यांनी केलाय. मुख्यमंत्री हे स्वतः हिंदूत्ववादी आहेत. असे असताना अमरावतीत हिंसाचार घडलाच कसा, असे परांडे म्हणाले.

बंगालसारखी परिस्थिती राज्यात घडवायची काय?

तीस ते चाळीस हजार जिहादींचा जमाव एकत्र आला. त्यांनी कायदा हातात धरून अमरावतीत हिंसाचार केला. हे सारे घडत असताना शासन आणि प्रशासन शांत कसे होते. तीन ठिकाणांहून मोर्चे निघाले. जमाव अनियंत्रित झाल्यानं मुख्य मार्गावर अनेक ठिकाणी दगडफेक करण्यात आली. व्यापारी पोलिस आणि अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला. पश्चिम बंगालसारखी परिस्थिती महाराष्ट्रात घडवून आणायची आहे काय, अशी टीका परांडे यांनी केली. हिंदू समाज हा शांतताप्रिय आहे. या समाजाला वेठीस धरण्याचे आणि नुकसान पोहचविण्याचे हे षडयंत्र आहे. शासन व प्रशासन यांनी वेळीच सावध व्हावे, अन्यथा हिंदू समाजाला आपले संरक्षण करावे लागेल. हिंदू समाज यासाठी सक्षम आहे. अमरावतीच्या या घटनेचा विश्व हिंदू परिषद, बजरंग दल निषेध करीत असल्याचं परांडे यांनी सांगितलं.

नुकसानग्रस्तांना नुकसानभरपाई देण्यात यावी

रजा अकॅडमीच्या संबंधितांवर गुन्हे दाखल करून अटक करावी. नुकसानग्रस्तांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी विहिंपच्या वतीनं करण्यात आली. त्रिपुरात कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही. भ्रामक व चुकीची माहिती प्रसारित करण्यात आली. चुकीच्या माहितीच्या आधारावर ही हिंसा करण्यात आली. हिंसाचार करणाऱ्या रजा अकॅदमीला प्रतिबंध घालावे, यासाठी राज्यपालांना भेटणार असल्याचे परांडे यांनी स्पष्ट केले. यावेळी पत्रकार परिषदेला विहिंपचे विदर्भ प्रांतमंत्री गोविंद शेंडे, प्रांत उपाध्यक्ष डॉ. हेमंत जांभेकर, प्रांत सहमंत्री प्रशांत तितरे, प्रांत प्रचार प्रसारप्रमुख निरंजन रिसालदार उपस्थित होते.

महाराष्ट्रावर कृपादृष्टी कायम ठेवून, राज्याची भरभराट करण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांचे श्री विठ्ठलाच्या चरणी साकडे

Video: जेव्हा मोदींनी हात जोडून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना साष्टांग नमस्कार केला