नागपूर : शहर जी 20 च्या निमित्ताने सर्वत्र सजला आहे. मात्र विदेशी पाहुण्यांना नागपूरच पहिलं दर्शन होणार ते नागपूर विमानतळाचं. त्यामुळे नागपूर विमानतळाला लाइटिंगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सजविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे नागपूर शहराला ग्रीन सिटी म्हटले जाते. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांचे प्लांटेशन करून त्यावर रंगीबेरंगी लाईट मारण्यात आले. नागपूर हे टायगर कॅपिटल असल्याने डोममध्ये एक मोठा वाघ साकारण्यात आला आहे. नागपूरच्या विमानतळावर जात असताना किंवा विमानतळावर पोहोचल्यानंतर आपण नागपूरच्या विमानतळावर नाही तर कुठल्यातरी प्रगत देशाच्या विमानतळावर आहो की काय असा भास झाल्याशिवाय राहत नाही. या संपूर्ण सजावटीचं सगळं डिझाईन केलं आहे ते आर्किटेक राजेश गोतमारे यांनी.