Nagpur Gas Leak : नागपूरमध्ये गॅस लीक दुर्घटना, 200 मीटरचा परिसर रिकामा, 40 जण हॉस्पिटलमध्ये दाखल

Nagpur Gas Leak : नागपूरमध्ये गॅस लीकची मोठी दुर्घटना घडली आहे. जवळपास 200 मीटरचा परिसर रिकामा करण्यात आला आहे.

Nagpur Gas Leak : नागपूरमध्ये गॅस लीक दुर्घटना, 200 मीटरचा परिसर रिकामा, 40 जण हॉस्पिटलमध्ये दाखल
Nagpur Gas Leak
| Edited By: | Updated on: Aug 24, 2026 | 7:17 AM

गजानन उमाटे, प्रतिनिधी : नागपूरच्या गोधणी ग्रामपंचायत परिसरात गॅस लीकची मोठी दुर्घटना घडली आहे. जवळपास 200 मीटरचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. परिसरातील लोकांना दुसरीकडे हलवलं आहे. गोधणी ग्रामपंचायत येथील वॅाटर फिल्टर प्लॅाट परिसरात क्लोरीन गॅस लीकची घटना घडली आहे. गॅस लीकमुळे जवळपास 40 लोकांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून प्रयत्न सुरु आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास गॅस लीक झाल्याची माहिती आहे.

रुग्णालयात 60 पेक्षा जास्त रुग्ण दाखल 

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या गोधणी ग्रामपंचायत परिसरात असलेल्या वॉटर फिल्टर प्लाँटमध्ये क्लोरीन गॅस लीक झाला आहे. क्लोरिन गॅसल लीक झाल्यानंतर गोधणी गावातील लोकांना दुसरीकडे हलवलं आहे. या गॅस लीकमुळे जवळपास 15 हून अधिक लोकांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याचे समोर आलं आहे. गॅस लीक त्रास झालेल्या लोकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेचे अग्निशमन विभाग घटनास्थळी पोहोचला. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास गॅस लीक झाल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दलानंतर एनडीआरएफ देखील घटनास्थळी पोहोचलं. त्यांनीही बचावकार्य सुरू केलं. रुग्णालयात ६० पेक्षा जास्त जणांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळत आहे.

NDRF कडून ॲापरेशन अद्याप सुरू

नागपूरच्या गोधणीमधील या घटनेवर मानकापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश कळसेकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, ‘क्लोरीन गॅस लिक झाल्याने २०० मिटरपर्यंतचा परिसरत खाली केला आहे. आतापर्यंत ४० पेक्षा जास्त स्थानिकांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल केलं आहे. आता ११ वाजेपर्यंत या परिसरात कुणालाही येण्याची परवानगी नाही. NDRF कडून ॲापरेशन अद्याप सुरू आहे’. या घटनेनंतर स्थानिकही एकमेकांना मदत करत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us