Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NMC Election 2022: आताही भाजपला गड राखता येणार की चित्र बदलणार; नागपुरात प्रभाग क्र. 23 मध्ये राष्ट्रवादीला करावी लागणार कसरत

राज्यात सत्ताबदल झाल्यामुळे नागपूर महानगरपालिकेवर त्याचा सकारात्मक की नकारात्मक परिणाम होणार हे आता येत्या निवडणुकीतच पाहावे लागणार आहे.

NMC Election 2022: आताही भाजपला गड राखता येणार की चित्र बदलणार; नागपुरात प्रभाग क्र. 23 मध्ये राष्ट्रवादीला करावी लागणार कसरत
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 5:00 AM

नागपूरः भाजपचा (BJP) बालेकिल्ला समजला जाणाऱ्या नागपुरात (Nagpur) आता महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे, त्यातच राज्यात सत्ताबदल होऊन नागपुरच्या देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदी निवड झाली आहे. गेल्या पंधरा वर्षापासून नागपूर महानगरपालिकेवर सत्ता आहे. मागील निवडणुकीतही प्रभाग क्र. 23 मध्ये तीन नगरसेवक भाजपचे तर एक नगरसेवक हा राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) निवडून आला होता. त्यामुळे यंदाही या प्रभागात भाजपचेच वर्चस्व राहणार की, ते बदलणार हे निवडणुकीनंतरच चित्र स्पष्ट होईल. राज्यात सत्ताबदल झाल्यामुळे नागपूर महानगरपालिकेवर त्याचा सकारात्मक की नकारात्मक परिणाम होणार हे आता येत्या निवडणुकीतच पाहावे लागणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांचे या महानगरपालिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.

मागील निवडणुकीतील विजेते

नागपूर महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत प्रभाग क्र. 23 मध्ये कांता रारोकर, मनीषा धावडे, नरेंद्र बोरकर हे तीन उमेदवार भाजपकडून निवडून आले होते, तर दुनेश्वर पेठे हे राष्ट्रवादी पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर निवडून आले होते. मात्र आगामी निवडणुकीत येथील प्रभाग क्र. 23 मधील फेररचना झाल्याने चार ऐवजी तीन उमेदवार या प्रभागामधून आपले नशीब अजमावणार आहेत. त्यामुळे या बदलेल्या रचनेमुळे निवडणुकीता आता काय परिणाम होणार हे येणारा काळच सांगू शकणार आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/इतर
आरक्षणामुळे कसरत

नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 23 मध्ये एकूण मतदान हे 45377 एवढे असून आता प्रभाग क्र. 23 ची रचना बदलली असून काही दिवसापूर्वी आरक्षण जाहीर झाल्यानंतर या प्रभागात दोन सर्वसाधारण महिलांसाठी आणि एक प्रभाग हा सर्वसाधारण उमेदवारासाठी गेला आहे. त्यामुळे आता या प्रभागात उमेदवारांची कसरत करावी लागणार आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/इतर

वॉर्ड कुठूनपासून कुठपर्यंत

नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 23 हा बजेरिया, भोईपुरा, हंसापूरी, ज्योतीनगर, डागा हॉस्पिटल, सुत मार्केट, तहसील पोलीस स्टेशन, लोधीपुरा, गांधीबाग, जुना जेलखाना, भालदपूरा, गंजीपेठ, नयापुरा, कुंभारपूरा, लाल ईमली, कासारपूरा, खापरीपुरा, उत्तर भागाला रामझुला चौकापासुन पूर्वेकडे जाणाऱ्या सीए रोडने मेयो हॉस्पिटल जवळील जुना भंडरा रोडच्या संगमापर्यंत, नंतर पुढे पूर्वेकडे जुना भंडारा रोडने डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील गांजाखेत चौकापर्यंत, नंतर पुढे त्याच रस्त्याने शहीद चौकापर्यंत तर पूर्व भागात शहीद चौकापासून दक्षिणेकडे जाणाऱ्या रस्त्याने सीए रोडवरील गांधीपुतळा चौकापर्यंत आहेत दक्षिण बाजूला सीए रोडवरील गांधीपुतळा चौकापासून पश्चिमेकडे जाणाऱ्या सीए रोडने सीए रोडवरील अग्रसेन चौकापर्यं, नंतर पुढे दक्षिणेकडे जाणाऱ्या सिमेंट रोडने चिटणीस पार्क जवळील रुईकर चौकापर्यंत. नंतर पुढे पश्चिमेकडे जाणाऱ्या सर बेजनजी मेहता रोडने नातीक चौकापर्यंत नंतर पुढे त्याच रोडने महानगरपालिका जकात नाका नं. 13 जवळील कॉटन मार्केट रस्त्यापर्यंत. तर पश्चिम परिसरात कॉटन मार्केट रस्त्यावरील महानगरपालिका जकात नाका नं. 13 पासुन उत्तरेकडे जाणाऱ्या कॉटन मार्केट रस्त्याने राम झुला चौकापर्यंत.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
शिवसेना
मनसे
अपक्ष/इतर
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.