‘प्रति शिवसेना भवन बांधाल पण त्यात देव असावा लागतो, तो पहिल्या शिवसेना भवनात’, जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एकनाथ शिंदे यांना जोरदार टोला लगावलाय. 'प्रति शिवसेना भवन बांधतील पण त्यात देव असावा लागतो. तो देव पहिल्या शिवसेना भवनात आहे', अशा शब्दात पाटील यांनी शिंदेंना टोला लगावलाय.

'प्रति शिवसेना भवन बांधाल पण त्यात देव असावा लागतो, तो पहिल्या शिवसेना भवनात', जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा
जयंत पाटील, शिवसेना भवन, एकनाथ शिंदेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 10:08 PM

सोलापूर : एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर आता शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा, आणि शिवसेना भवन कुणाचं? असा प्रश्न विचारला जातोय. त्याचवेळी शिंदे गट मुंबईत प्रति शिवसेना भवन (Shivsena Bhavan) उभारणार असल्याची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात जोरात सुरु आहे. त्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या कार्यालयासाठी शिंदे गटाकडून दादरमध्ये मध्यवर्ती ठिकाणी जागेचा शोध सुरु असल्याची माहिती आमदार सदा सरवणकर यांनीच दिलीय. या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एकनाथ शिंदे यांना जोरदार टोला लगावलाय. ‘प्रति शिवसेना भवन बांधतील पण त्यात देव असावा लागतो. तो देव पहिल्या शिवसेना भवनात आहे’, अशा शब्दात पाटील यांनी शिंदेंना टोला लगावलाय.

जयंत पाटील आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना भवनाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिलीय. एकनाथ शिंदे यांची ताकद मोठी आहे. सुरत, गुवाहाटीला त्यांनी ताकद दाखवली आहे. त्यामुळे प्रति शिवसेना भवन बांधतील पण त्यात देव असावा लागतो. तो देव पहिल्या शिवसेना भवनात आहे. महाराष्ट्रात शिवसैनिक हे विसरणार नाही, असं पाटील म्हणाले.

‘..आता एकनाथ शिंदेंना कळलं असेल’

मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावरुनही पाटील यांनी शिंदे आणि फडणवीसांवर टीका केलीय. शिंदे आणि फडणवीस यांनी 40 दिवस मंत्रिमंडळात कुणाला घेतलं नाही. त्यानंतर लोकांमधून ओरड आल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला. विस्तार होऊन तीन दिवस झाले आहेत. सकाळी शपथ घेतल्यानंतर संध्याकाळी खातेवाटप केले जाते अशी परंपरा आहे. मात्र, मुख्यमंत्री झाल्यानंतर खातेवाटप करणं किती कठीण आहे हे एकनाथ शिंदेंना आता कळलं असेल. आता त्यांना कदाचित आपलं नगरविकास खातंच बरं होतं असं वाटत असेल.

‘आमदार, खासदार हलले असतील, पण शिवसैनिक आजही शिवसेनेत’

मी राज्यभरात प्रवास करतोय, मी पाहतोय की शिवसेनेतील आमदार, खासदार, नेते हलले असतील, पण शिवसैनिक आजही शिवसेनेत आहे. यापूर्वीही आमदार, खासदार सोडून गेले पण शिवसैनिकांनी त्यांना पाडले. शिवसेनेची, शिवसैनिकांची ही परंपरा आहे, असा सूचक इशाराही पाटील यांनी शिंदे गटाला दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पक्ष म्हणून वाढण्याचा प्रयत्न आम्ही करु. त्याचबरोबर महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सभागृहात मांडू. आम्ही तिनही पक्ष सक्षमपणे विरोधी पक्ष म्हणून काम करु, असंही पाटील यांनी स्पष्ट केलंय.

‘तिघेजण जेवायला बसलो असू तर चौथा वाटा जीएसटीचा’

आज तुम्ही घालत असलेले कपडे, तुम्ही खात असलेला तांदूळ यावरही टॅक्स दावा लागतोय. आपण घरात तिघेजण जेवायला बसलो असू तर चौथा वाटा जीएसटीचा आहे. आजपर्यंत देशात कुणीही अन्नधान्यावर कर लावायचं धाडस केलं नव्हतं. पण आता तेही झालं, अशी टीका पाटील यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर केलीय.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.