नागपुरात आढळले ओमिक्रॅानचे तीन म्युटेशन, निरीच्या संशोधनातून सिद्ध

| Updated on: Jan 24, 2022 | 10:42 AM

राज्यावर कोरोनाचे संकट सुरु असतानाच आता ओमिक्रॉनमध्येही नवे व्हेरियंट सापडत आहेत. नागपुरात निरीच्या संशोधनात आता ओमिक्रॉनमध्ये म्युटेशन आढळून आले आहे. मात्र त्याबाबत अजून कोणताही खुलासा शास्त्रज्ञांनाकडून करण्यात आला नाही.

नागपुरात आढळले ओमिक्रॅानचे तीन म्युटेशन, निरीच्या संशोधनातून सिद्ध
Follow us on

नागपूरः राज्यावर कोरोनाचे (Corona) संकट सुरु असतानाच ओमिक्रॉनचे (Omicron) रुग्ण आढळून येत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात (Maharashtra) कोरोना आणि ओमिक्रॉनची रुग्ण संख्या वाढत आहे. नागपुरात ओमिक्रॉनमध्ये म्युटेशन आढळून आले आहेत. नागपुरात निरीच्या संशोधनातून ओमिक्रॉनमध्ये हे म्युटेशन आढळून आल्याचे सांगण्यात आले आहे. निरीमध्ये चौथ्या टप्प्यातील 89 नमुन्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले होते. यामधील ८९ नमुन्यांपैकी सर्व नमुन्यांची तपासणी केल्यानंतर त्यामधील सर्व नमुने ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
याबाबत निरीच्या शास्त्रज्ञानांना ओमिक्रॅान विषाणूतील बदल कशाप्रकारे प्रभाव टाकणार यावर विचारले असता त्याबाबत बोलण्यावर त्यांनी नकार दिला आहे.

नागपूरात चौथ्या टप्प्यात जे नमुने घेण्यात आले त्यातील 66.2 टक्के नमुन्यांमध्ये ओमिक्रॉनचा बी-2 (BA.2) हा ही विषाणू आढळून आला आहे. कोरोना आणि ओमिक्रॉनमध्ये बदल होत असल्याने आणि त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने भीतीचे वातावरणही पसरले आहे.

निरीच्या शास्त्रज्ञांकडून बोलण्यास नकार

नागपूरामध्ये ओमिक्रॉनमध्ये म्युटेशन दिसून आले असले तरी किंवा बी-2 हा विषाणू आढळून आला असला तरी ओमिक्रॉन विषाणूतील बदल कशाप्रकारे प्रभाव टाकणार आहे याबाबत मात्र निरीच्या शास्त्रज्ञांनी बोलण्यास नकार दिला आहे.

महाराष्ट्रात सगळ्यात जास्त रुग्णांची संख्या

देशातही कोरोनाचे संकट वाढत असल्याने अनेक राज्यांनी कोरोनाचे निर्बंध कडक केले आहे. भारतात गेल्या 24 तासात 3 लाख 6 हजार 64 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर रविवारी 439 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा रेट 20.75 टक्क्यांवर पोहचला आहे. गेल्या चोवीस देशातील रुग्णांमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकात सगळ्यात जास्त रुग्णांची नोंद झाली आहे.
महाराष्ट्रात सध्या 40 हजार 805 रुग्णांची नोंद झाली असून 44 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 70 लाख 67 हजार 955 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ओमिक्रॉनचे 2 हजार 579 रुग्ण झाले असून 1 हजार 225 जण ओमिक्रॉनच्या संसर्गातून मुक्त झाले आहेत.

संबंधित बातम्या

Napgur Accident | पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघात, तीन वाहनं एकमेकांवर आदळली, 5 जणांचा जागीच मृत्यू

Nana Patole on Modi: पटोलेंनी पुन्हा काडी टाकली; म्हणाले, ज्याची बायको पळते, त्याचेच नाव मोदी ठरते!

चोर समजून रिक्षा चालकाला इतरं मारलं, इतकं मारलं की तो मेलाच! कुटुंबीयांचे गंभीर आरोप