Nana Patole on Modi: पटोलेंनी पुन्हा काडी टाकली; म्हणाले, ज्याची बायको पळते, त्याचेच नाव मोदी ठरते!

पटोले यांनी नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी येथे सुरू असलेल्या काँग्रेस प्रशिक्षण शिबिराच्या समारोपाला हजेरी लावली. मात्र, जाता-जाता पुन्हा एकदा त्यांनीच आपल्याच वादग्रस्त वक्तव्याचा वाद शमायचा वाटही न पाहता, त्यात पुन्हा एक काडी टाकली आहे.

Nana Patole on Modi: पटोलेंनी पुन्हा काडी टाकली; म्हणाले, ज्याची बायको पळते, त्याचेच नाव मोदी ठरते!
नाना पटोलेंचे भाजपला जोरदार प्रत्युत्तर
Follow us
| Updated on: Jan 24, 2022 | 10:18 AM

नाशिकः गेल्या काही दिवसांमागून वादग्रस्त वक्तव्ये करून राजकारणात राळ उडवणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. ज्याची बायको पळते, त्याचेच नाव मोदी ठरते, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर करून त्यांनी पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे. पटोले यांनी नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी येथे सुरू असलेल्या काँग्रेस प्रशिक्षण शिबिराच्या समारोपाला हजेरी लावली. मात्र, जाता-जाता पुन्हा एकदा त्यांनीच आपल्याच वादग्रस्त वक्तव्याचा वाद शमायचा वाटही न पाहता, त्यात पुन्हा एक काडी टाकली. त्यामुळे येणाऱ्या काळात पटोलेविरुद्ध भाजप असे चित्र राज्याच्या राजकारणात दिसणार आहे.

आधी म्हणाले मोदीला मारू शकतो…

पटोलो यांनी काहीच दिवसांपू्र्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. तसा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात ते म्हणतात, “मी का भांडतो? मी आता मागील 30 वर्षापासून राजकारणात आहे. लोकं पाच वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करुन टाकतात. शाळा, कॉलेज हे करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली. एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला. एक प्रमाणिक नेतृत्व तुमच्या इथे आहे….”असं आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला आणि ऐकायला मिळत आहे.

नंतर म्हणाले, आमच्या गावात गावगुंड

आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण देतानाही पटोले यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले, “त्या भागात निवडणुका चालू आहेत. आमच्या भागात मोदी नावाचा एक गावगुंड आहे. त्याची तक्रार गाववाले करत होते. मी त्यांना सांगत होतो की घाबरू नका मी तुमच्या सोबत आहे आणि मला कुणाला घाबरण्याची गरज नाही. त्यावर ते वाक्य आहे. पंतप्रधान मोदींबद्दल ते वाक्य नाही. या प्रकरणाचा बाऊ केला जात असेल तर भाग वेगळा आहे. तुम्ही तो व्हिडीओ पाहा, त्यात लोकांच्या तक्ररीनंतर लोकांमध्ये मी बोललो आहे. मी कुठल्या भाषणात मी हे बोललो नाही. गावगुंडाची तक्रार लोक करत होते आणि त्यांना मी आश्वस्त करत होतो. या व्हिडीओत मी पंतप्रधानांचा उल्लेख केला नाही किंवा नरेंद्र असा शब्दही वापरला नाही. मोदी नावाचा गावगुंड आहे, त्याबद्दल मी बोललो आहे”, असे स्पष्टीकरण पटोले यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिले होते.

भाजप आमचा मुख्य शत्रू

इगतपुरी येथे पटोले म्हणाले की, गावगुंडांना गावगुंडच दिसतील. त्यांची आता हलाखीची परिस्थिती झालीय. लोक भाजपवर हसत आहेत. ज्याची बायको पळते, त्याचे नाव मोदी ठरते. असे हे झाल्यावर आता काय बाकी राहिले आहे, असे म्हणत त्यांनी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकात पाटील यांच्यावरही तोडसुख घेतले. पुढे ते म्हणाले की, नाना पटोले म्हणाले की, भाजप आणि शिवसेना यांची अनेक वर्षे मुंबई महापालिकेत सत्ता राहिली आहे. भाजप हा आमचा मुख्य शत्रू आहे. त्यामुळे आमची त्याच पद्धतीची भूमिका आणि रणनीती राहणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला. मात्र, या वक्तव्यामुळे येणाऱ्या काळात वाद वाढणार यात शंका नाही.

इतर बातम्याः

Balasaheb Thackeray | उभ्या महाराष्ट्रावर गारूड करणारा बाळासाहेब नावाचा झंझावात…!

Nashik Trees | पर्यावरण मंत्र्यांच्या एका सूचनेमुळे 200 वर्षे पुरातन वटवृक्षासह 450 झाडे वाचणार, प्रकरण काय?

Jitendra Awhad | नाशिक महापालिकेने म्हाडाचे 700 कोटींचे नुकसान केले; आव्हाडांचा हल्लाबोल, चौकशी सुरू!

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.