Nagpur : नागपुरात ‘या’ भागात आज पाणीपुरवठा बंद! नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन

| Updated on: May 31, 2022 | 7:49 AM

Nagpur Water Cut : नागपुरातील चार झोन मधील जलकुंभाचा पाणी पुरवठा आज बंद राहणार आहे.

Nagpur : नागपुरात या भागात आज पाणीपुरवठा बंद! नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन
नागपुरात आज पाणीबाणी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूर : नागपुरात आज पाणीपुरवठा (Nagpur Water Cut) बंद राहणार आहे. जलकुंभच्या जोडणीसाठी नागपुरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम जाणवणार आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मान्सूनपर्व कामांना वेग आलाय. नागपुरातही (Nagpur News) पाणी पुरवठा विभागाने दुरूस्तीची कामं हाती घेतलीत. तसेच अनेक कामं पावसाळ्यात कर्मचाऱ्यांना करणं शक्य होत नाही. त्यामुळे मान्सून पावसापूर्व कामं तातडीनं संपवण्यासाठी मोहीम राबवली जातेय. दरम्यान, नवीन जलकुंभ उभारण्यात आलं असून या जलकुंभाच्या जोडणी करीता आज (मंगळवार) दिवसभर नागपुरात पाणी पुरवठा पुर्णपणे बंद राहणार आहे. पालिकेकडून (Nagpur Municipal Corporation) नागरिकांना पाणी जपून वापरावं, असं आवाहन करण्यात आलंय. तसंच पत्रकात पालिकेला सहकार्य करण्याचंही आवाहन केलं गेलंय. महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, ठाणे या जिल्ह्यात देखील दुरूस्तीची कामे नुकतीच झाली आहेत. या कामांसाठी पाणी पुरवठा काही काळ थांबवण्यात आला होता. तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात आला होता.

आज कुठे कुठे पाणी पुरवठा बंद?

धरमपेठ

लक्ष्मीनगर

हे सुद्धा वाचा

हनुमान नगर

पाणी पुरवठा मंगळवारी बंद राहणार आहे

नागपुरातील चार झोन मधील जलकुंभाचा पाणी पुरवठा आज बंद राहणार आहे. त्यामध्ये धरमपेठ ,लक्ष्मीनगर, हनुमान नगर या परिसरात पाणी पुरवठा केला जाणार नाही. दुरूस्तीचं काम झाल्यानंतर पाणी पुरवठा कमी दाबाने केला जाईल.

दोन दिवसांनी पाणी पुरवठा सुरळीत होईल, असं पाणी पुरवठा विभागाने म्हटलंय. नवीन जलकुंभ उभारण्यात आले असून जलकुंभाच्या 1200 मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर आंतरजोडणीच्या कामासाठी 18 तास पाणी पुरवठा बंद करण्यात आलाय.

जुलै अखेरीस पुरेल इतकं पाणी

या वर्षी महाराष्ट्रात चांगलाच उन्हाळा पाहायला मिळाला. सध्या महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस पडायला सुरूवातदेखील झालीयॉ. त्यामुळे लोकांना उकाड्यापासून अल्प प्रमाणात दिलासा मिळालाय.

पाहा व्हिडीओ :

महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या धरणात जुलै अखेरीस पुरेल एवढा पाणी पुरवठा शिल्लक असून यावर्षी चांगला पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलीय. त्यामुळे पुढच्या वर्षीही पाणी पुरवठ्याची समस्या निर्माण होणार, असा विश्वास व्यक्त केला जातोय.