Nagpur Crime | नागपूरच्या नरसाळ्यात देहव्यापार, सामाजिक सुरक्षा विभागाची धाड, दोन पीडितांची सुटका

नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत महिला घरातून देहव्यापार चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकत दोन महिलांना मुक्त केलं. व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक केली.

Nagpur Crime | नागपूरच्या नरसाळ्यात देहव्यापार, सामाजिक सुरक्षा विभागाची धाड, दोन पीडितांची सुटका
नागपूरच्या नरसाळ्यात देहव्यापार, सामाजिक सुरक्षा विभागाची धाड
Image Credit source: t v 9
सुनील ढगे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

May 18, 2022 | 9:56 AM

नागपूर : हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नरसाळा (Narsala) परिसरात एका महिलेच्या घरातून देहव्यापराचा व्यवसाय होत असल्याची गुप्त माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला (Social Security Department) मिळाली. त्यांनी या ठिकाणी पाळत ठेवत खात्री करून घेतली. मग त्याठिकाणी छापा टाकला असता दोन महिलांच्या माध्यमातून या ठिकाणी देहव्यापार सुरू होता. ही महिला या महिलांना पैशाचं आमिष दाखवत आणि त्यांना धमकावत त्यांच्याकडून व्यवसाय करून घेऊन पैसे कमवायची. पोलिसांनी त्याठिकाणावरून दोन महिलांची सुटका केली तर व्यवसाय करायला लावणाऱ्या महिलेला अटक केली. अशी माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस निरीक्षक ललिता तोडासे (Police Inspector Lalita Todase) यांनी दिली.

व्यवसाय करणाऱ्या महिलेला अटक

नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत महिला घरातून देहव्यापार चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकत दोन महिलांना मुक्त केलं. व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक केली. या महिलेवर आधी सुद्धा अश्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. तिने किती महिलांना कोणत्या पद्धतीने या व्यवसायात आणलं याचा शोध पोलीस घेत आहेत.

हुडकेश्वर ठाण्याच्या हद्दीतील घटना

नरसाळा परिसरात देहव्यापार सुरू होता. हा भाग हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. या प्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागानं धाड टाकली. यात दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. आरोपी महिलेला अटक करण्यात आली. ही महिला दोन पीडितांकडून देहव्यापार करून घेत होती. आता तिला जेलही हवा खावी लागणार आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें