नागपुरात राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदावर कोणाची वर्णी, दिग्गज स्थानिक नेत्यांमध्ये चुरस

| Updated on: Jun 08, 2021 | 5:57 PM

नागपूरच्या शहराध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी अनेक स्थानिक नेत्यांची चुरस लागली आहे. यामध्ये प्रामुख्याने दुनेश्वर पेठे, प्रशांत पवार यांच्यासह अनेकांची नावे चर्चेत आहेत.

नागपुरात राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदावर कोणाची वर्णी, दिग्गज स्थानिक नेत्यांमध्ये चुरस
राष्ट्रवादी काँग्रेस परिसंवाद यात्रा
Follow us on

नागपूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी नागपूरमध्ये राष्ट्रवादीत मोठे फेरबदल होत आहेत. अनिल अहिरकर यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपवल्यानंतर आता नागपूरच्या शहराध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी अनेक स्थानिक नेत्यांची चुरस लागली आहे. या शर्यतीत येथील अनेक स्थानिक नेते आहेत. यामध्ये प्रामुख्याने दुनेश्वर पेठे (Duneshwar Pethe), प्रशांत पवार ( Prashant Pawar) यांच्यासह अनेकांची नावे चर्चेत आहेत. (NCP is going to appoint new Nagpur city chief Duneshwar Pethe Prashant Pawar in race)

शहराध्यक्ष पदासाठी चुरस

अनिल अहिरकर यांनी नागपूर शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा सध्या रिक्त आहे. अनिल अहिरकर यांच्याकडे सध्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा शहराध्यक्ष हा स्वच्छ प्रतिमेचा आणि राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेत्यांचा सन्मान करणारा असावा अशी भूमिका मांडली आहे. अहिरकर यांच्या या भूमिकेनंतर नागपूर राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षपदासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी सुरु केलीय. यात दुनेश्वर पेठे, प्रशांत पवार यांच्यासह अनेकांची नावं चर्चेत आहे. अनिल अहिरकर यांनी स्वच्छ प्रतिमेच्या अध्यक्षाची मागणी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राष्ट्रवादीमध्ये गटबाजी उफळल्याची जोरदार चर्चा

नागपूरमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यासाठी भाजप, काँग्रेस तसेच इतर पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. हा विचार लक्षात घेऊन राष्ट्रवादीनेसुद्धा मोठे पक्षीय फेरबदल करणे सुरु केले आहे. मात्र, सध्या शहराध्यक्ष पद रिकामे असल्यामुळे येथे राष्ट्रवादीमध्ये मनपाच्या निवडणुकीपूर्वी गटबाजी उफाळल्याची चर्चा आहे. या चर्चेनंतर आता राष्ट्रवादीचे नेतृत्व काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अनिल अहिरकर यांचा 4 जून रोजी राजीनामा

दरम्यान, 4 जून रोजी अनिल अहिरकर यांनी आपल्या नागपूर शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सोपवला होता. त्यांच्या या राजीनाम्यानंतर एकीकडे अनेक तर्कवितर्क लावले जात होते. तर दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याचीही चर्चा सुरु होती.

इतर बातम्या :

Weather Alert: विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवशी मान्सूनचं आगमन होणार

Video: पोटात घुसलेला चाकू घेऊन तरुण पोलीस ठाण्यात, नागपूरच्या व्हिडीओनं महाराष्ट्र हादरला

नागपुरात अनलॉक अंतर्गत निर्बंध शिथील, पहिल्या दिवसाची काय परिस्थिती ?, मेट्रो प्रशासनाची काय तयारी ?

(NCP is going to appoint new Nagpur city chief Duneshwar Pethe Prashant Pawar in race)