नागपुरात अनलॉक अंतर्गत निर्बंध शिथील, पहिल्या दिवसाची काय परिस्थिती ?, मेट्रो प्रशासनाची काय तयारी ?

नागपुरात आज शहरात ठिकठिकाणी बाजारपेठा फुलल्या होत्या. अनेक ठिकाणी गर्दी झाली होती. (nagpur corona unlock metro arrangement)

नागपूर : राज्य शासनाने अनलॉक अंतर्गत अनेक निर्बंध शिथील केले आहेत. या निर्बंधांतर्गत नागपूरमध्येही काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. नव्या नियमानुसार आजपासून नागपूर मेट्रो सेवा सुरु करण्यात आली आहे. तसेच नागपूरमधील इतर दुकाने तसेच आस्थापनासुद्धा नियमांच्या अधीन राहून सुरु करण्यात आल्या आहेत. यामुळे आज शहरात ठिकठिकाणी बाजारपेठा फुलल्या असून अनेक ठिकाणी गर्दी झाली. (Nagpur first day Corona unlock and Metro arrangement)

सेवा देण्यासाठी महा मेट्रो प्रशासन सज्ज

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नागरिकांनाच मेट्रोने प्रवास करण्याची यापूर्वी मुभा होती. परंतु राज्य शासनाच्या नवीन सूचना मिळताच दर 30 मिनिटांनी मेट्रो सेवा देण्याकरिता महा मेट्रो प्रशासन सज्ज झाले आहे.

मेट्रो गाड्यांचे नियमितपणे निर्जंतुकीकरण

प्रवाशांसाठी सर्व खबरदारी म्हणून महा मेट्रोकडून अनेक उपायोजना करण्यात आल्या आहेत. सुरक्षित प्रवासाचे उद्दीष्ट समोर ठेवून मेट्रोच्या वतीने मेट्रो गाड्यांचे नियमितपणे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. तसेच मेट्रो स्थानकावर ज्याठिकाणी रहदारी असते ते ठिकाण वारंवार स्वच्छ केले जात आहे.

याव्यतिरिक्त मेट्रो कर्मचारी मास्क आणि हँड ग्लोव्ह्ज घालून काम करत आहेत. तसेच केंद्र शासन आणि राज्य शासनाने जारी केलेल्या दिशा निर्देशांचे पालनसुद्धा करण्यात येत आहे.

प्रवाशांकरिता सूचना फलक

तसेच शासनाने जारी केलेले निर्देश प्रवाशांना तसेच मेट्रो कर्मचाऱ्यांना नियमितपणे सांगण्यात येत आहेत. मेट्रो ट्रेन तसेच स्टेशनवर कोविड- 19 शी संबंधित स्पीकरद्वारे जागरुकता करण्यात येतेय. मेट्रो स्टेशन परिसरात प्रवाशांकरिता सूचना फलकदेखील लावण्यात आले आहेत. प्रवाशांनी डिजिटल पद्धतीने तिकीट खरेदी करावे यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.

आजपासून खासगी आणि सरकारी कार्यालये उघडण्याची परवानगी

नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा पॅाझिटिव्हीटी रेट 3.86 टक्के असून, सध्या 8.13 टक्के ॲाक्सिजन बेड्सचा वापर होतोय. त्यामुळे नागपूर जिल्हा लेव्हल वनमध्ये असल्याने आजपासून खासगी आणि सरकारी कार्यालये उघडण्याची परवानगी देण्यात आलीय.

आर्थिक गाडा पुन्हा रुळावर येण्यास सुरुवात

सायंकाळी पाच वाजेपर्यंत खासगी आणि सरकारी कार्यालये सुरु राहणार आहे. त्यामुळे रुतलेला आर्थिक गाडा पुन्हा रुळावर येण्यास सुरुवात होणार आहे. असा विश्वास व्यावसायिक व्यक्त करतायत. खासगी कार्यालये सुरु करण्याची परवानगी दिल्याने, बांधकाम, ट्रान्सपोर्ट, इलेक्ट्रॉनिक्स, मल्टिस्टेट संस्था अशा अनेक खासगी कार्यालयात कामकाजाला सुरुवात झालीय. कोविडचे नियम पाळत कार्यालये सुरु केल्याचे चित्र आज दिवसभरात बघायला मिळाले.

इतर बातम्या :

Nagpur Unlock | अनलॉक अंतर्गत नागपूरमध्ये नवी नियमावली, सायंकाळी 5 नंतर जमावबंदी, काय बंद काय सुरु ?

मोबाईल, सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे कुटुंबामध्ये संशयाचं भूत, पाच महिन्यात तब्बल 704 तक्रारी

Corona Vaccine : नागपुरात लहान मुलांवर कोरोना लसीची चाचणी होणार, संपूर्ण राज्याचं लक्ष

(Nagpur first day Corona unlock and Metro arrangement)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI