Nitin Gadkari: राजकारणात वाढले एक्सपोर्ट इम्पोर्ट… भाजपमध्ये सर्वाधिक प्रवेश होत असतानाच… आयाराम-गयारामांवर नितीन गडकरींचा अचूक निशाणा

Nitin Gadkari: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सध्याच्या राजकारणावर चांगलेच तोंडसूख घेतले. सध्या भाजपमध्ये सर्वाधिक प्रवेश होत आहेत. भाजप ही प्रवेशपार्टी ठरली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव सेनेपासून इतर पक्षातील नेते भाजपमध्ये येत असतानाच नितीन गडकरी यांनी आयाराम-गयारामांवर अचूक निशाणा साधला.

Nitin Gadkari: राजकारणात वाढले एक्सपोर्ट इम्पोर्ट... भाजपमध्ये सर्वाधिक प्रवेश होत असतानाच... आयाराम-गयारामांवर नितीन गडकरींचा अचूक निशाणा
नितीन गडकरी
Image Credit source: गुगल
| Updated on: Jan 13, 2026 | 8:55 AM

Nitin Gadkari: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या खास मुलाखतीत सध्याच्या राजकारणातील नेत्यांच्या कोलंट्याउड्यावर मोठे भाष्य केले. भाजप ही राष्ट्रीय प्रवेश पार्टी ठरली आहे. गेल्या दोन वर्षांपासून इतर पक्षांपेक्षा सर्वाधिक पक्ष प्रवेश भाजपमध्ये झाले. भाजपचे प्रदेशाध्यक्षांमध्ये पक्ष प्रवेशांची जणू स्पर्धाच लागली आहे. त्याचवेळी या मुलाखतीत नितीन गडकरी यांनी या सर्व प्रकारांवर तोंडसूख घेतले. त्यांनी आयाराम-गयाराम स्पर्धेवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी राजकारणातील या प्रवेश पर्वावर अचूक निशाणा साधला. यावेळी त्यांनी नागपूरच्या विकासाचे व्हिझनही समोर आणले. काय म्हणाले गडकरी?

राजकारणात वाढलं इम्पोर्ट-एक्स्पोर्ट 

नागपुर माझी जन्मभूमी आहे. इथल्या अनेक लोकांच्या सहवासामध्ये मला राहण्याची संधी मिळाली आणि त्यातूनच जे कार्य केलं, ते पण या सगळ्यांच्या बरोबर काम केलं. त्यामुळे नागपूरचा मला खूप अभिमान आहे आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की मी नागपूरचा आहे आणि नागपूरची जनता माझा परिवार आहे, असे वक्तव्य गडकरी यांनी केले.खाण्याची नियत माझी कमी झाली नसल्याचे ते मिश्किलपणे म्हणाले. तरीही 43 किलो वजन कमी झाल्याचे त्यांनी सांगितले.दिल्लीत नाश्त्यावेळी जितके लोक असतात, तितक्यांसाठी नाश्ता तयार होतो. तर जेवणाच्या वेळी सुद्धा उपस्थित सर्वांना जेवण मिळते असे ते म्हणाले.दिल्लीत एवढा मोठा बंगला आहे त्यात शेती सुद्धा होतेआणि त्यामुळे तिथे मोर सुद्धा येतो, असे त्यांनी सांगितले.

निवडणुकीची आठवण जागवताना आम्ही ज्या काळात काम करायचं ऑटोरिक्षात आम्ही अनाउन्समेंट करायचो तेव्हा मानसन्मान नव्हता, मात्र काम करण्यात वेगळा आनंद होता, असे गडकरींनी सांगितले. जी पार्टी सत्तेत आहे त्याच्यात जा आणि त्याची सत्ता गेली की ज्याची सत्ता आहे त्याच्या जा आता हे एक्सपोर्ट इम्पोर्ट जास्त होत आहे, असा निशाणा त्यांनी आयाराम-गयाराम संस्कृतीवर साधला.

महापालिका निवडणुकीत बहुमत

नागपूर मध्ये आम्ही जेव्हा राजकारणात आलो नगरपालिकेची मीटिंग होती ते महाल परिसरात व्हायची. त्यावेळी शहरात पाणी नसायची, आम्ही मटका घेऊन जायचो. मात्र त्यावेळी आमच्यावर लाठी चार्ज सुद्धा झाला, अशी आठवण त्यांनी जागवली. आम्हाला या महापालिका निवडणुकीत 101% मेजॉरिटी मिळणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आम्ही कचऱ्यापासून सीएनजी गॅस तयार करतो आहे त्यापासून आम्ही स्कूटर मोटर बसेस चालणार आहे . नागपुरात पाच सहा वर्षा आधी जी परिस्थिती होती की दोन-चार घरात गेलं आणि विचारलं की तुमच्या मुलगा कुठे आहे मुंबई पुण्यात आहे मला वाईट वाटायचं तेव्हा आम्ही सिंबायोसिस आणले. नागपूरच्या मुलांना यात पंधरा टक्के सवलत आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून आम्ही एडवांटेज विदर्भ सुरू केलं गडचिरोली जिल्हा सोसायटी आणि इकॉनॉमिक मागासलेला आहे तेथे चांगला पद्धतीने इन्व्हेस्ट सुरू आहे. वर्धा रोडवर जागतिक दर्जाचा बर्ड पार्क तयार करतो आहे. त्यात जगातला सर्व पक्षी आणणार आहे. इंटरनॅशनल एअरपोर्ट आम्ही नागपुरात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे, असे गडगरींनी स्पष्ट केले.