Video – Nagpur | आता माघार नाही, एस कर्मचारी संपावर ठाम, जी कारवाई करायची ती करा!

Video - Nagpur | आता माघार नाही, एस कर्मचारी संपावर ठाम, जी कारवाई करायची ती करा!
नागपुरात संपावर असलेले एसटीचे कर्मचारी.

नागपुरातील एसटी कर्मचारी मागं हटायला तयार नाहीत. सरकारनं कितीही कारवाईची भीती दाखवली तरी जोपर्यंत विलनीकरणाची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतलीय.

गजानन उमाटे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Dec 13, 2021 | 11:00 AM

नागपूर : विलनीकरणाच्या मागणीसाठी संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज शेवटचा अल्टीमेटम दिलाय. कर्मचाऱ्यांनी आज कामावर रुजू न झाल्यास त्यांच्यावर केलेली निलंबनाची कारवाई अंतिम राहणार आहे. सोबत त्यांच्यावर मेस्मा लावण्याची शक्यता आहे. मात्र, नागपुरातील एसटी कर्मचारी मागं हटायला तयार नाहीत. सरकारनं कितीही कारवाईची भीती दाखवली तरी जोपर्यंत विलनीकरणाची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतलीय.

राज्यातील 21 हजार कर्मचारी कामावर रुजू झालेत. तरीही काही कर्मचारी अद्याप कामावर रुजू झालेले नाहीत. नागपुरात गणेशपेठ आगारातून एकही बस सुटली नाही. कारवाई करायची आहे, तर करा. पण, कर्मचारी कामावर रुजू होणार नाहीत, असं स्पष्ट मत एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलंय.

कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहणार

सरकारच्या अल्टिमेटमनंतरही काही कर्मचारी संपावर ठाम आहेत. कारवाई झाली तरी चालेल. प्रवाशांचे हाल होत आहेत. याबद्दल आम्हाला दुःख होत आहे. पण, सरकारनं योग्य तो निर्णय घ्यावा. २० तारखेनंतर कोर्टाच्या निर्णयानंतर आम्ही योग्य तो निर्णय घेऊ, असं एसटी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.

बंद बसचा विद्यार्थ्यांना फटका

सहा नोव्हेंबर रोजी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी नागपुरातून संप पुकारला होता. कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. बस बंद असल्यामुळं बसनं प्रवास करणारे विद्यार्थी शाळेत पोहचू शकत नाहीत. प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही हाल आहेत. हे मान्य करतो. पण, आमची आर्थिक स्थिती सुधारायला पाहिजे, असं कर्मचारी संघटनेचं म्हणण आहे.

 

पगारवाढीवर कर्मचारी समाधानी नाहीत

परिवहन मंत्र्यांनी दिलेली पगारवाढ ही तुकड्यांमध्ये असल्यानं कर्मचारी नाराज आहेत. दिलेली वाढ ही अत्यंत कमी आहे. सेवा देणाऱ्या वरिष्ठांना योग्य प्रमाणात पगारवाढ झाली नसल्याच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच म्हणणंय. वाहतूक निरीक्षकांना मशीन देण्यात आली. त्यामुळं त्या दोन बसेस सुरू झाल्या. विलीनीकरण ही न्यायालयीन प्रक्रिया आहे. पण, योग्य प्रमाणात पगारवाढ मिळावं, अशीच कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

Yavatmal | वणीत नियम धाब्यावर बसवून कोळसा वाहतूक? धूळ व प्रदूषणाची समस्या कायम

Nagpur | महाजनको, खनिकर्म महामंडळात गैरव्यवहार; पावणेपाच हजार कोटींची भ्रष्टाचार – प्रशांत पवार यांचा आरोप

Omicron| नागपुरातल्या ओमिक्रॉन बाधितानं घेतली नव्हती लस; एम्सच्या विशेष खोलीत उपचार

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें