पब, बारवर पोलिसांची नजर, काय आहे ऑपरेशन नार्को फ्लॅश आऊट?

| Updated on: Oct 14, 2022 | 6:48 PM

ड्रग पेडलर आणि ड्रग सेवन करणाऱ्यांवर पोलिसांच्या या सेलची करडी नजर राहणार आहे.

पब, बारवर पोलिसांची नजर, काय आहे ऑपरेशन नार्को फ्लॅश आऊट?
काय आहे ऑपरेशन नार्को फ्लॅश आऊट?
Image Credit source: tv 9
Follow us on

सुनील ढगे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर : ड्रग्जच्या विरोधात नागपूर पोलीस (Nagpur Police) ॲक्शन मोडवर आले आहेत. आजपासून नागपुरात ऑपरेशन नार्को फ्लॅश आऊटची (Operation Narco Flash Out) सुरुवात करण्यात आली. यासाठी नार्को इंटेलिजेस युनिट क्राईम ब्रांच (Crime Branch) मार्फत स्थापन करण्यात आलं. प्रत्येक पोलीस स्टेशनला एक नार्को सेल तयार करण्यात येत आहे. नागपुरात वाढत असलेली ड्रग्ज तस्करी आणि सेवन या दोन्हीवर आता पोलिसांची करडी नजर असणार आहे.

नागपुरात वाढती ड्रग्ज तस्करी आणि सेवन यातून शहराला मुक्त करण्यासाठी नागपूर पोलिसांनी कडक पावलं उचलली आहेत. ऑपरेशन नार्को फ्लॅश आऊट, हे ऑपरेशन राबविण्यासाठी पोलिसांनी नार्को इंटेलिजेस युनिट क्राईम ब्रांचमार्फत स्थापन करण्यात आलं.

प्रत्येक पोलीस स्टेशनला एक नार्को सेल तयार करण्यात येत आहे. गेल्या पाच वर्षात 1 हजार 150 आरोपी पकडण्यात आले. त्यांच्या माध्यमातून कुंडली तयार करण्यात आली आहे.

ड्रग पेडलर आणि ड्रग सेवन करणाऱ्यांवर पोलिसांच्या या सेलची करडी नजर राहणार आहे. त्याचप्रमाणे पब, बारवरसुद्धा लक्ष ठेवण्यात येणार आहे. पोलिसांकडून शहरात 22 हॉटस्पॉट निवडण्यात आले.

या ठिकाणी उघड्यावर ड्रग सेवन आणि देवाण-घेवाण होते. त्यावर लक्ष ठेऊन कारवाई केली जाणार आहे. आज पहिल्याच दिवशी स्कूल, कॉलेजजवळ सिगारेट, गुटखा सारख्या वस्तू विक्री करणाऱ्यावर 180 ठिकाणी कारवाई करण्यात आली.

हे ऑपरेशन समाजासाठी असल्याने जनतेचा सहयोग आवश्यक आहे. असं नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार कुमार यांनी सांगितलं.

नागपुरात वाढत असलेली ड्रग तस्करी आणि त्याच सेवन करणाऱ्यांची वाढती संख्या बघता हे ऑपरेशन आवश्यक आहे. पोलिसांना या ऑपरेशनमध्ये कितपत यश मिळतं हे पाहावं लागणार आहे.