AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अजित पवारांचा ताफा अडवला, नेमकं काय घडलं?

अमरावतीत आज एक अनपेक्षित घटना घडली. अजित पवार अमरावतीचा दौरा आटोपून नागपूरच्या दिशेला निघाले असता त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस संघर्ष संघटनेच्या आंदोलकांनी अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

मोठी बातमी! अजित पवारांचा ताफा अडवला, नेमकं काय घडलं?
| Updated on: Dec 09, 2023 | 6:29 PM
Share

अक्षय मंकणी, नागपूर | 9 डिसेंबर 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न अमरावतीजवळ करण्यात आला आहे. विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस संघर्ष संघटनेच्या आंदोलकांनी अजित पवार यांचा ताफा अडवला आहे. अजित पवार हे आज अमरावतीच्या दौऱ्यावर होते. ते अमरावती येथील त्यांचं काम आटोपून नागपूरच्या दिशेला निघाले होते. या दरम्यान त्यांचा ताफा विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस संघर्ष संघटनेकडून अडवण्यात आला. यावेळी परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी तातडीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यायाळी प्रयत्न सुरु केले. यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

नेमकं काय घडलं?

विधी मंडळाचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनादरम्यान विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस संघर्ष संघटनेचा नागपूरच्या विधान भवनावर धडक मोर्चा निघाला आहे. त्यांचा मोर्चा सुरु असताना रस्त्याने अजित पवार यांचा ताफा जात होता. हा ताफा बघितल्यानंतर आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवला. आंदोलकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जाब विचारला. विदर्भातील शेतकऱ्यांना हे सरकार कधीपर्यंत मदत करणार? असा जाब शेतकऱ्यांनी अजित पवारांना विचारला.

नागपूरच्या कारंजा परिसरात संबंधित घटना घडली. आंदोलकांनी एक लेनचा महामार्ग सुद्धा अडवून ठेवला. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी मध्यस्थी केली. पोलिसांनी आंदोलकांना बाजूला केलं. त्यानंतर अजित पवार यांचा ताफा पुढे गेला.

आंदोलकांची प्रतिक्रिया काय?

यावेळी आंदोलकांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “आमची मागणी एवढीच आहे, जे मुख्यमंत्री आम्हाला म्हणात की, शेतकऱ्यांचे आम्ही कैवारी आहोत, तेच मुख्यमंत्री शेतकरी पायी चालत असताना त्यांचं निवेदन घेण्याची तसदी घेत नाही. असे भूलथापा देणारं हे सरकार आहे. जे सरकार प्रकल्प करतं ते शेतकऱ्यांचं ऐकून घ्यायला तयार नाही. लाखो रुपयांच्या दौऱ्यावर, अनेक गोष्टींवर खर्च करतात, शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही, म्हणून सगळे शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. आम्हाला न्याय मिळाला नाही तर चक्काजाम करु”, असा इशारा आंदोलकांनी दिला.

ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.