नागपुरात रेशनच्या धान्याची चोरी, तब्बल 26 लाखांचा मुद्देमाल जप्त, पोलिसांनी डाव हाणून पाडला

| Updated on: Oct 18, 2021 | 10:28 PM

रेशनचे धान्य चोरी करून ते व्यापाऱ्यांच्या गोदामात पोहचविणारे मोठे रॅकेट राज्यभर सक्रिय आहे. नागपुरात जरीपटका पोलिसांनी 26 लाखांचे धान्य चोरी करणारे एक रॅकेट उघडकीस आणले.

नागपुरात रेशनच्या धान्याची चोरी, तब्बल 26 लाखांचा मुद्देमाल जप्त, पोलिसांनी डाव हाणून पाडला
सांकेतिक फोटो
Follow us on

नागपूर : रेशनचे धान्य चोरी करून ते व्यापाऱ्यांच्या गोदामात पोहचविणारे मोठे रॅकेट राज्यभर सक्रिय आहे. नागपुरात जरीपटका पोलिसांनी 26 लाख रुपयांचे धान्य चोरी करणारे एक रॅकेट उघडकीस आणले आहे. सरकारी गोदमातून धान्य घेऊन निघालेले वाहन मधेच अडवून त्यातील धान्य काढून घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. संपूर्ण राज्यात हे धान्य माफिया सक्रिय आहेत. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या धान्य प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. या धान्य चोरीची आयजी दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.

पोलिसांनी कारवाईत 26 लाखांचा मुद्देमाल जप्त केला

नागपुरातील जरीपटका पोलिसांनी सरकारी गोदामातून रेशनचे धान्य घेऊन जाणारे वाहन अडवून त्यातून धान्य काढण्याऱ्या टोळीला अटक केली. पोलिसांनी या कारवाईत 26 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून यात मोठे माफिया सहभागी आहेत. रेशन दुकानदार संघटनेने या घोटाळ्याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आयजी दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी

तर दुसरीकडे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या घोटाळ्याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी आयजी दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे ही धान्य तस्करी ट्रकचालकांनी केली आहे. याच्याशी आमचा संबंध नाही, याची चौकशी झाली तरी ट्रकचालकावर कारवाई होणार, असा दावा नागपूर जिल्ह्यातील मुख्य धान्य नाहतूक करणाऱ्या गणेश करिअर कंपनीच्या प्रमुखांनी केला.

धान्यचोरीवर अंकुश ठेवणे गरजेचे

दरम्यान, रेशन दुकानामार्फत गरिबांना अल्प दारात धान्य वाटप केलं जातं. राज्य आणि केंद्र सरकारकडून हे धान्य जिल्ह्यातील गोदामांमध्ये पाठवलं जातं. मात्र, हे धान्य गरिबांच्या ताटात न पोहोचता व्यापाऱ्यांच्या गोदामात पोहचून त्यातून कोट्यवधी रुपयांचा घोळ केला जातो. त्यामुळं या धान्यचोरीवर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. राज्य सरकारनं या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे

इतर बातम्या :

हा महाराष्ट्र आहे, यंत्रणांच्या धाडीमुळं कधीचं माग हटणार नाही, छगन भुजबळांनी भाजपला ललकारलं

प्रकाश आंबेडकर राजकारणात सक्रीय, नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीसांना मोलाचा सल्ला

VIDEO : ऐकावं ते नवलच! मुंबईत भारतीय पोशाख परिधान केल्यास चक्क रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाही

(racket stealing ration grains and delivering them to traders caught in Nagpur chhagan bhujbal ordered inquiry)