NMC : कुठं पाणी साचले, तर कुठं झाडं पडली, पावसाळी तक्रारींवर नागपूर मनपाद्वारे निराकरण, आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी केली पाहणी

काटोल रोड येथील तक्रार प्राप्त झाली. अग्निशमन पथकाद्वारे हॉस्पिटलमध्ये जमा पाणी काढण्याची कार्यवाही करण्यात आली.

NMC : कुठं पाणी साचले, तर कुठं झाडं पडली, पावसाळी तक्रारींवर नागपूर मनपाद्वारे निराकरण, आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी केली पाहणी
आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी केली पावसाळी स्थितीची पाहणीImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 9:31 PM

नागपूर : मागील तीन-चार दिवसांपासून शहरात पाऊस सुरू आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये नागपूरकरांना भेडसावणा-या समस्यांवर दिलासा मिळवून देण्यासाठी नागपूर महापालिका प्रशासन प्राधान्याने कार्य करीत आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. (Radhakrishnan) यांच्या मार्गदर्शनात नियंत्रण कक्ष (Control Room) तैनात करण्यात आले आहे. मनपाकडे विविध माध्यमातून प्राप्त होणा-या तक्रारींवर तात्काळ दखल घेत कार्यवाही करण्यात येत आहे. मनपाच्या अग्निशमन विभागाचे (Fire Department) जवान शहरात सर्वत्र सेवाकार्य बजावत आहेत. राधाकृष्णन बी. यांच्यासह अन्य अधिका-यांनी शहरातील विविध भागात प्रामुख्याने शंकरनगर, नरेंद्र नगर, पडोळे चौक येथे पाहणी केली. आयुक्तांनी संबंधित अधिका-यांना या भागात पाणी साचू नये या संदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. मनपा आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, उपायुक्त (घनकचरा) डॉ. गजेन्द्र महल्ले, सहाय्यक आयुक्त प्रकाश वराडे यांनी विविध भागात भेट देऊन पाहणी केली. याशिवाय मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार तैनात नियंत्रण कक्षामध्ये प्राप्त तक्रारींच्या आधारे मनपाच्या अग्निशमन विभागाद्वारे सेवाकार्य बजावून नागरिकांना दिलासा मिळवून देण्यात आला.

रस्त्यावर झाड पडल्याची तक्रार

झाड पडण्याबाबत धरमपेठ झोन अंतर्गत जी.पी.ओ. चौक ते राजा राणी चौक या रोडवर, हिस्लॉप कॉलेज जवळ रोडवर तक्रार प्राप्त झाली. जुने आर.बी.आय. रामदासपेठ कॅनल रोड, संविधान चौकामध्ये, लक्ष्मीनगर झोन अंतर्गत आर.पी.टी.एस. रोडवरील जेरील लॉन जवळ, धंतोली झोन अंतर्गत काही ठिकाणाहून तक्रार प्राप्त झाली. संबंधित झोन पथकाद्वारे तात्काळ सेवाकार्य बजावले. रस्ता मोकळा करण्यात आला. याशिवाय मस्कासाथ येथील माधव लीला कॉम्प्लेक्स जवळ पक्षी अडकल्याची तक्रार प्राप्त झाली. यावर पक्ष्याला सुखरूप बाहेर काढून लकडगंज झोन पथकाद्वारे जीवनदान देण्यात आले.

पाणी साचल्याची तक्रार

पाणी साचण्याबाबत लकडगंज झोन अंतर्गत कळमना मिल कॅन्सर हॉस्पिटल, गिट्री लेआउट गोधनी रोड पांडुरंग मंगल कार्यालयाजवळील तक्रार प्राप्त झाली. काटोल रोड येथील तक्रार प्राप्त झाली. अग्निशमन पथकाद्वारे हॉस्पिटलमध्ये जमा पाणी काढण्याची कार्यवाही करण्यात आली. याशिवाय धरमपेठ झोन अंतर्गत नाका नं. दहाजवळ रस्त्यावर खड्डा पडून पाणी साचले. धंतोली झोन अंतर्गत गणेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स येथे खड्डा पडून पाणी साचल्याची तक्रार प्राप्त झाली. यावरही झोन पथकाद्वारे कार्यवाही करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

झोननिहाय २४ तास कार्यरत नियंत्रण कक्ष

  • लक्ष्मीनगर 2245833/2245028
  • धरमपेठ 2567056/2565589
  • हनुमाननगर 2755589
  • धंतोली 2958401/2958400
  • नेहरूनगर 2700090/2702126
  • गांधीबाग 2735599
  • सतरंजीपुरा 7030577650
  • लकडगंज 2737599/2739020
  • आशीनगर 2655605/2655603
  • मंगळवारी 2596903
Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.