Mohan Bhagwat: तुम्ही राष्ट्रवादी आहात का? सरसंघचालक मोहन भागवतांचं चपखल उत्तर, म्हणाले…त्यात वाद कशाला?
RSS Chief Mohan Bhagwat: सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याची सतत चर्चा होते. त्यांच्या अनेक उपक्रमांचे कौतुक झाले. समन्वयाचे त्यांचे धोरण कायम चर्चेत राहिले आहे. तर आता राष्ट्रवादावर त्यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे. काय म्हणाले राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक?

नागपूरमध्ये साहित्यिकांच्या विश्वात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अनेक विषयांवर मतं मांडली. त्यांनी वाचन आणि त्यातून येणारं शहाणपण यावर मंथन केले. साहित्यसृजनता हा लेखकांचा धर्म आहे. लिहिताना भावना महत्वाची असली तरी उद्देश लोक कल्याण असायला हवी, लेखकांनी लिहिताना पुरस्कार मिळेल या उद्देशाने लिहू नये असे आवाहनही त्यांनी केलं. शिकलेला माणूस हुशार असेल असं गृहीत धरलं जातं, असे सरसंघचालक (RSS Chief Mohan Bhagwat) म्हणाले. तर राष्ट्रवादावरही त्यांनी मिश्किल टिप्पणी केली.
साहित्यिकांच्या विश्वात शाब्दिक कोटी
मी जुना झालो म्हणून आशीर्वाद देऊ शकतो पण लेखकांना मार्गदर्शन कस करणार असे ते म्हणाले. मी लिखाण करण्यात आळशी आहे. पण वाचण्यात लक्ष आहे. माझ्या वाचनातून जे लक्षात आलं ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. वाचनातून समजदारी नाही तर माहिती देखील मिळते. माहिती असणे आयुष्यात आवश्यक पण माहितीमधून समजदार होणं देखील आवश्यक आहे. यशाला मापदंड लावला तर जगात अपयशाचं प्राबल्य आहे. आपल्या जीवनाचा काही कोणासाठी काही उपयोग झालं तर जीवनाच सार्थक होते यश काही काळ सुखी करू शकते, असे मत सरसंघचालकांनी मांडले.
लेखकांचा धर्म कोणता?
साहित्यसृजनता हा लेखकांचा धर्म आहे. साहित्य शब्दाचा अर्थ सोबत देणारा दुसरा अर्थ हिताची सोबत देणारा असा आहे. शिकलेला माणूस हुशार असेल असं गृहीत धरलं जातं. उपयुक्त एकाच शब्दाचा वापर मोठा परिणाम करू शकतो तर चुकीचा एक शब्द मोठे अनर्थ करू शकतो. साहित्यिक लोकांचे उपकार आहे. त्यामुळे त्यांना शब्द सृष्टीचे ईश्वर मानला जातं, ते जे करतील ते मंगलकारी असेल अशी श्रद्धा आजही कायम आहे लेखकांनी लिहिताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की ती बाब मानवीमूल्याच्या दृष्टीने योग्य आहे की नाही. ज्या पण भाषेत लिहिलं जात तेव्हा त्या शब्दातील भाव पोहोचले पाहिजे. पुस्तक भाषांतरीत करताना त्याचे भाव बघावे लागतात, असे बौद्धिक भागवतांनी केले.
तुम्ही राष्ट्रवादी आहात का?
लोक मला विचारतात तुम्ही राष्ट्रवादी आहे का मी सांगतो मी राष्ट्रीय आहे त्यात वाद कशाला? अशी मिश्किल टिप्पणीही भागवत यांनी केली. आम्ही वाद करत नाही आम्ही विवादाच्या दूर आहे,आम्हाला राष्ट्रवादी म्हटलं जातं. आपले मत मांडण बंद केले त्याला इजम अस म्हटलं जातं. आपण आपले शब्द जाणत नाही त्यांनी त्याला नेशन म्हटलं म्हणून आम्ही नाशनलिझम म्हटलं. नॅशनलिझम मुळे दोन महायुद्ध झाले.आमचं राष्ट्र अहंकारातून जन्माला आल नाही, अहंकार संपल्यावर राष्ट्र जन्माला आले, असे भागवत म्हणाले.
सगळ्यांना जोडण्यासाठी समाजाला एकत्र करत राष्ट्र निर्माण करण्यात आलं. तुम्ही जंगलात गेले, रस्तावर गेले, कोणाला विचारलं तर तत्वज्ञान सांगणार नाही पण व्यवहार सांगेल. राष्ट्र सोबत सत्तेचा संबंध नाही.भूमीसोबत नात असेल तर राष्ट्र निर्माण होत. आम्ही भारत मातेचे पुत्र म्हणून भारतीय, जातीमुळे धर्मामुळे, खानपान हे सगळ विविधता असताना देखील आम्ही भारत मातेचे पुत्र म्हणून एकत्र स्टेट नव्हता तेव्हा पण भारत होता, सम्राट होते, तेव्हा पण भारत होता, गुलाम होते तेव्हा पण भारत होतो, इंग्रज यायच्या आधी आम्ही एक नव्हतो हे इंग्रजांनी आम्हाला उलट शिकवलं हे गांधींनी सांगितल्याचे भागवत म्हणाले.
लोक मला विचारतात तुम्ही राष्ट्रवादी आहे का मी सांगतो मी राष्ट्रीय आहे त्यात वाद कशाला,अशी टिप्पणी त्यांनी केली. काही बिघडवायच असेल तरी साहित्याचा प्रयोग होतो देशात असे प्रयोग झाले आहेत. मी लहानपणी पासून वाचतोय मला लेखकांशी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली नाही ती आज मिळाली. लिहिताना भावना महत्वाची असली तरी उद्देश लोक कल्याण असायला हवी, लेखकांनी लिहिताना पुरस्कार मिळेल या उद्देशाने लिहू नका. लोक तुम्हाला काय पुरस्कार देणार एखाद्या वाचकाने काय सुंदर लिहिलं हे म्हटलं तरी तो पुरस्कार आहे, असे भागवतांनी स्पष्ट केलं.
