Nagpur School : 26 जानेवारीपर्यंत नागपुरातील शाळा बंदच, पालकमंत्र्यांचे आदेश काय? वाचा सविस्तर

| Updated on: Jan 22, 2022 | 3:20 PM

नागपूरात कोरोनाची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे, त्याच गांभीर्य ओळखणं गरजेचं आहे. त्यामुळे नागपुरातील शाळा लगेच सुरू होणार नाही, येत्या 26 जानेवारीपर्यंत तरी नागपुरातील शाळा बंदच राहणार असल्याचे पालकमंत्री राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

Nagpur School : 26 जानेवारीपर्यंत नागपुरातील शाळा बंदच, पालकमंत्र्यांचे आदेश काय? वाचा सविस्तर
नितीन राऊत, ऊर्जा मंत्री
Follow us on

नागपूर : येत्या सोमवारपासून राज्यातल्या शाळा सुरू (School Reopen) करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. तर पुण्यातल्या शाळांबाबत (Pune schools) अजूनही निर्णय झाला नाही. तसेच औरंगाबाद महापालिकेनेही पॉझिटिव्ह रेट जास्त असल्यामुळे शाळांबाबत निर्णय घेतलेला नाही, अशावेळी उपराजधानी नागपुरातील शाळांचं (Nagpur Schools) काय? असा सवाल नागपूरकरांच्या मनात होता, त्यावर आता नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. नागपूरात कोरोनाची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे, त्याच गांभीर्य ओळखणं गरजेचं आहे. त्यामुळे नागपुरातील शाळा लगेच सुरू होणार नाही, येत्या 26 जानेवारीपर्यंत तरी नागपुरातील शाळा बंदच राहणार असल्याचे पालकमंत्री राऊत यांनी स्पष्ट केले आहे. कोरोनाकाळात इतर घटकांबरोबर विद्यार्थ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे मुलांच्या लसीकरणावर भर देऊन राज्यातल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपुरातील परिस्थिती नियंत्रणात आल्यावरच नागपुरातील शाळांबाबत निर्णय होईल.

लसीकरण आणि चाचण्या वाढवल्या

लसीकरणाची गती वाढवलीय, चाचण्याही वाढवल्या आहेत. गरजेच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यावर शासनचा भर आहे.तसेच बाजारातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासन उपाययोजना आखत आहेत, अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली आहे. सोमवारी व्यापारी संघटनांशी चर्चा करणार ज्या मनपा झोनमध्ये जास्त रुग्ण वाढतायत, त्यावर नजर ठेऊन आहोत असेही राऊत म्हणाले आहेत. ॲाक्सीजन आणि बेड रिकामे नसतील तेव्हा निर्बंध लावले जातात, पुढील आठवड्यात तरी लोकांचं नुकसान होईल असे निर्बंध लावणार नाही. मास्क न लावणाऱ्यांवर करडी नजर असल्याचेही राऊतांनी यावेळी सांगितले.

जानवेरीच्या अखेरपर्यंत रुग्ण वाढत राहणार

जानेवारीच्या शेवटपर्यंत रुग्ण वाढणार आहेत, फेब्रुवारीत रुग्णसंख्या स्थिर राहील रुग्ण फार वाढले, गुरज भासली तर लोकांशी बोलून निर्बंध लावले जातील, असे सूचक विधानही पालकमंत्र्यांनी केले आहे. तसेच मला भेटायला कार्यालयात आलेल्यांची तपासणी केली, त्यापैकी चार जण कोरोना पॅाझिटिव्ह आले आहेत, अशी महितीही त्यांनी यावेळी दिली आहे. नागपुरात सध्या 17000 बेडपैकी 8 हजार ॲाक्सीजन बेड आहेत. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे.

Pune School | पुण्यात शाळा, कॉलेज बंदच, पण काय राहणार सुरू; काय म्हणाले अजित पवार?

पुण्यात कोविडमुक्त गाव अभियान राबवणार, ग्रामपंचायतींना मिळणार 50 लाखाचे बक्षीस: अजित पवार

Pune| ‘अजित पवार सकाळपासून कष्ट घेतो’, अभिनेते नाना पाटेकरकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कौतुक