Pune| ‘अजित पवार सकाळपासून कष्ट घेतो’, अभिनेते नाना पाटेकरकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कौतुक

Pune| 'अजित पवार सकाळपासून कष्ट घेतो', अभिनेते नाना पाटेकरकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कौतुक
Nana Patekar

तो फार चांगला पुढारी आहे. सरकारने केलेल्या कामाना जेवढी प्रसिद्धी मिळत नाही. याउलट आम्ही अगदी छोटंसं काम केलं तरी खूप प्रसिद्धी मिळते. त्यांनी केलेलं काम समोर आणा, तो खरंच चांगला नेता आहे. असं मत व्यक्त करत अभिनेते नाना पाटेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार याचे कौतुक केलं आहे.

योगेश बोरसे

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Jan 22, 2022 | 12:37 PM

पुणे – अजित पवार हा माणूस जितके काम करतो,  त्याची जाहिरात कधी करत नाही. इमानाने गपचूप काम करत राहतो. एखादी कुठली तरी चुकीची गोष्ट असेल तर तेवढीच अधोरेखित माध्यमांकडून केली जाते. मात्र त्यांनी केलेलं काम समोर आणा. इतकंच नव्हेत तर तो फार चांगला पुढारी आहे. सरकारने केलेल्या कामाना जेवढी प्रसिद्धी मिळत नाही. याउलट आम्ही अगदी छोटंसं काम केलं तरी खूप प्रसिद्धी मिळते. त्यांनी केलेलं काम समोर आणा, तो खरंच चांगला नेता आहे. असं मत व्यक्त करत अभिनेते नाना पाटेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार याचे कौतुक केलं आहे.

विरोधपक्षातील लोक ही आपणच निवडून दिले आहे. तीही माणसे पक्ष बदलणाऱ्या माणसाला पाच वर्षे कोणतेही पद देऊ नका. मग कोणीही पक्ष बदलणार नाही.काहीतरी नियम असायला हवेत. किमान शिक्षणाची अट हवी असे मतही त्यांनी व्यक्त केली आहे.

नियम पाळतो म्हणजे उपकार नव्हे कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या काळात कोविडचे नियम सर्वांनी पाळायला हवे. नियम पाळतो म्हणजे स्वतःवरच उपकार करत आहोत. कोविडच्या काळात नाती समजली. कोरोनाने सर्वांना जमिनीवर आणलं. सरकार तर आहेच, पण सर्वांनी स्वतःहून प्रयत्न करणे गरजेचे आहे . कोरोनाच्या काळात गमावलं खूप पण त्याच काळात नाती समजली. नेमका कुठं उभे आहोत , नेमका कशाचा गर्व आपल्याला असायला हवा हे समजले.

Market Committee Election | 14 बाजार समित्यांचे संचालक बिनघोर; नाशिकमध्ये कधीपर्यंत निवडणुका लांबल्या?

काय तुम्हाला ‘ही’ लक्षणं दिसत आहेत, मग लिव्हरकडे लक्ष देणं गरजेचं आहे…जाणून घ्या ती लक्षणं एका क्लिकवर

सत्तार उद्या शिनसेनेत राहण्याचीच खात्री नाही, दानवेंना नांगरावर पाठवणारा कुणीही नाही, डॉ. भागवत कराड यांची खरमरीत टीका!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें