सत्तार उद्या शिवसेनेत राहण्याचीच खात्री नाही, दानवेंना नांगरावर पाठवणारा कुणीही नाही, डॉ. भागवत कराड यांची खरमरीत टीका!

अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवेंना लवकरच नांगर हाकण्यास पाठवू, असे वक्तव्य केले होते. ही टीका भाजपच्या जिव्हारी लागली असून भाजप नेते आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी अब्दुल सत्तारांना खरमरीत उत्तर दिलं आहे.

सत्तार उद्या शिवसेनेत राहण्याचीच खात्री नाही, दानवेंना नांगरावर पाठवणारा कुणीही नाही, डॉ. भागवत कराड यांची खरमरीत टीका!
भाजप नेते डॉ. भागवत कराड, शिवसेना नेते अब्दुल सत्तार
Follow us
| Updated on: Jan 22, 2022 | 1:04 PM

औरंगाबादः सोयगाव नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना घवघवीत यश मिळालं. भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. मात्र यात दानवेंना हार पत्करावी लागली. सोयगाव येथील विजयी मिरवणुकीनंतर अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवेंना लवकरच नांगर हाकण्यास पाठवू, असे वक्तव्य केले होते. ही टीका भाजपच्या जिव्हारी लागली असून भाजप नेते आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी अब्दुल सत्तारांना खरमरीत उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले डॉ. भागवत कराड?

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सत्तार यांच्या टीकेला उत्तर देताना tv9 च्या प्रतिनिधींकडे प्रतिक्रिया नोंदवली. ते म्हणाले, अब्दुल सत्तार आज जे बोलतात ते उद्या विसरून जातात. रावसाहेब दानवे यांना वखरावर पाठवणारा लोकसभा मतदार संघात कुणीही नाही. अब्दुल स्ततार हे सत्तेच्या मागे धावणारे नेते आहेत. आगामी निवडणुकीत ते शिवसेनेबरोबर राहतीलच याची शक्यता नाही. त्यामुळे त्यांचं बोलणं आम्ही फार मनावर घेत नाहीत, अशी प्रतिक्रिया डॉ. भागवत कराड यांनी दिली.

सोयगावात सत्तारांनी भगवा फडकवला

औरंगाबाद जिल्ह्यात सोयगाव नगरपंचायतमधील एकूण 17 पैकी 11 जागांवर शिवसेनेने भगवा फडकवला आहे. तर भाजपला 6 जागांवर समाधान मानावे लागले. यावेळी प्रतिक्रिया देताना, सत्तार म्हणाले होते, रावसाहेब दानवे यांच्यासह दोन केंद्रीय राज्यमंत्री माझ्याविरोधात होते. मात्र त्यांना आम्ही भुईसपाट केले आहे. तसेच मागील लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचा पराभव करेपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही, असे सत्तार म्हणाले होते. सोयगावमधील विजयानंतर ही डोक्यावरील टोपी निघेल, असा विश्वास देतो, अशी विजयी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली होती.

इतर बातम्या-

VIDEO: शेलार म्हणाले, गोव्यात शिवसेनेचं डिपॉझिट जरी वाचले तरी… ; राऊतांनी ऐकवला मराठा साम्राज्याच मूलमंत्र!

Mauni Amavasya| 2022 या वर्षाची सोमवती अमावस्या कधी ? तीचे महत्त्व काय? जाणून घ्या

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.