आर्यन खानसाठी शिवसेनेचा नेता सर्वोच्च न्यायालयात; एनसीबीच्या कामाच्या चौकशीचीही केली मागणी

| Updated on: Oct 19, 2021 | 10:14 AM

ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानसाठी आता थेट शिवसेनेचा नेता सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून आर्यन खानच्या सुटकेची मागणी केली आहे. (Shiv Sena leader kishor tiwari moves SC seeking judicial enquiry into affairs of NCB at Mumbai)

आर्यन खानसाठी शिवसेनेचा नेता सर्वोच्च न्यायालयात; एनसीबीच्या कामाच्या चौकशीचीही केली मागणी
kishor tiwari
Follow us on

नागपूर: ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानसाठी आता थेट शिवसेनेचा नेता सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून आर्यन खानच्या सुटकेची मागणी केली आहे. तसेच एनसीबीच्या कामाची चौकशी करण्याची मागणीही किशोर तिवारी यांनी केली आहे.

किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात ई-मेलद्वारे याचिका दाखल केली असून त्यांची याचिका दाखल करून घेण्यात आली आहे. एकीकडे 3 हजार किलो ड्रग्ज मिळतात. मात्र मुंबई किंवा बॉलिवूडला धरून एनसीबी बदनामी करत आहे. त्यात काही लॉजिक काही निघत नाही. एनसीबी ही स्वतंत्र संवैधानिक संघटना असून आपल्या पदाचा गैरवापर करत आहे. आर्यनची केस ही शुल्लक केस आहे. त्यात काही रिकव्हरी नाही. पजेशन नाही. आर्यनला 24 तासासाठी अटक करण्यात आली आहे. नंतर त्याला इंटरनॅशनल पेडलर ठरवलं गेलं. मग त्यात इंटरनॅशल रॅकेटही आलं. या सर्व ट्रायलच्या गोष्टी असून त्याला बेल मिळणे हा त्याचा राईट आहे, असं तिवारी यांनी सांगितलं. इतरांना जामीन होतो. त्याला 17 दिवसांपासून आत ठेवलं आहे, याकडेही त्यांनी याचिकेत लक्ष वेधलं आहे.

वानखेडेंचं काम कार्यकर्त्यांसारखं

एनसबीच्या कामाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी या याचिकेत करण्यात आल्याचं किशोर तिवारी यांनी सांगितलं. एनसीबीने मूलभूत हक्कांचा भंग केला आहे. आर्यनचे मूलभूत अधिकार गोठवून ठेवले आहेत. सुट्टी आहे म्हणून त्याला पाच दिवस डांबून ठेवलं गेलंय, असं सांगतानाच झोनल अधिकाऱ्याचा बॉलिवूडमध्ये वेस्टेड इंट्रेस्ट आहे. त्यांची पत्नी सिनेमात काम करते. मॉडल आहे. हा माणूसही कलाकारासारखं काम करतो. हा सर्व त्यांचा दुराग्रह आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. समीर वानखेडे भाजपच्या कार्यकर्त्यासारखे काम करतात. वानखेडे यांची हकालपट्टी करण्यात यावी आणि आर्यनला बेल मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

क्रूझवरील छापेमारीत काय सापडलं?

मुंबईच्या समुद्रात 2 ऑक्टोबर रोजी एका लग्झरी क्रुझवर एनसीबीने छापेमारी केली होती. त्या ड्रग्स पार्टीशी संबंधित महत्वाची माहिती आता समोर येतेय. क्रुझवर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले त्यावेळी अरबाज मर्चंटची कसून चौकशी करण्यात आली. एनसीबी अधिकाऱ्यांनी अरबाज मर्चंटला विचारलं की तुझ्याकडे ड्रग्स आहे का? तेव्हा त्याने सांगितलं की त्याने आपल्या बुटात ड्रग्स लपवलं आहे. एनसीबी अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर अरबाजने आपल्या बुटातून एक ZIP LOCK पाऊच काढलं, त्यात चरस होतं.

 

संबंधित बातम्या:

आर्यन खाननं पार्टीत ड्रग्ज घेतलं होतं की नाही? लाखमोलाच्या सवालाचं NCB च्या पंचनाम्यात उत्तर

Imtiaz Kharti : बॉलिवूडमधील सर्वात बडा मासा गळाला, NCB ची इम्तियाज खत्रीवर धाड

अनैतिक संबंध उघड होण्याची भीती, अल्पवयीन मुलीने बॉयफ्रेण्डसह भावाचाच गळा आवळला

(Shiv Sena leader kishor tiwari moves SC seeking judicial enquiry into affairs of NCB at Mumbai)