Social Media Post : ॲानलाईन मस्करीचे ॲाफलाईन दुष्परिणाम, समाज माध्यमांचा मोठा प्रभाव; व्यक्त होताना काळजी घ्या!

माहिती तंत्रज्ञान नियम-2000 आणि सायबर विनियम अपील न्यायाधिकरण (कार्यपद्धती) 2000 हा सायबर कायदा गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून एक प्रभावी कायदा आहे.

Social Media Post : ॲानलाईन मस्करीचे ॲाफलाईन दुष्परिणाम, समाज माध्यमांचा मोठा प्रभाव; व्यक्त होताना काळजी घ्या!
ॲानलाईन मस्करीचे ॲाफलाईन दुष्परिणामImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 1:56 PM

नागपूर – “मस्करी म्हणून सोशल मिडियावर पोस्ट (Social Media Post) करणाऱ्यांचं मोठं प्रमाण अधिक आहे. पण मस्करी मस्करीत सोशल मिडियावर केलेली पोस्ट तुम्हाला अडचणीची ठरु शकते किंवा त्याचे ॲाफलाईन (Offline) दुष्परिणाम भोगावे लागतील. अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल सोशल माध्यमात केलेली एक पोस्ट त्यांना थेट कारागृहात घेऊन गेली. गेल्या काही वर्षांत सोशल मिडियावर अशा वादग्रस्त पोस्टमुळे अनेकजण अडचणीत आले आहेत. आपली भावना एखाद्याजवळ व्यक्त करणं वेगळं, आणि जेव्हा तुम्ही ती भावना ट्वीटर सारख्या माध्यमावर पोस्ट करता. तेव्हा ती वाऱ्यासारखी पसरते. सोशल मिडियाच्या वाढलेल्या प्रभावामुळे मग त्यातून अडचणी निर्माण होतात. त्यामुळे सोशल मिडियावर व्यक्त होताना काळजी घ्या, असं आवाहन सोशल मिडिया तज्ज्ञ अजित पारसे यांनी केलं आहे.

सोशल मीडिया आणि आय-टी कायद्यातील काही तरतुदी 

माहिती तंत्रज्ञान नियम-2000 आणि सायबर विनियम अपील न्यायाधिकरण (कार्यपद्धती) 2000 हा सायबर कायदा गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून एक प्रभावी कायदा आहे.

हे सुद्धा वाचा

आयटी कायद्यातील कलम-66 अ मधील तरतुदीनुसार

एखाद्याची बदनामीकारक, खोडकर मॅसेज पाठविणं, मानहानी, इजा होणे, आकस, शत्रुत्व निर्माण होण्याची शक्यता. असे मॅसेज सोशल मिडियावर पाठवल्यास तीन वर्षे कैद आणि दंडाचीही तरतूद आहे. कलम-66 सी या कसमातंही तीन वर्षे आणि शिक्षा एक लाखापर्यंत दंडाची तरतुद आहे. याशिवाय कलम 66 डी, कलम 66 ई, कलम 67 बी आणि कलम 67 सी या कलमातूनंही सोशल मिडियावरील गुन्हेगारातून आपलं संरक्षण होतंय. त्यामुळे कायदे कठोर आहे. आता सोशल मिडियावर व्यक्त होताना तुम्ही काळजी घ्या, असं आवाहन सोशल मिडिया तज्ज्ञ अजित पारसे यांनी केलं आहे.

केतकी चितळेला पोस्ट केल्याचा कसलाही पश्चाताप नाही

केतकी चितळेंनी शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट केली होती. त्यानंतर तिला जेलमध्ये जावं लागलं. राज्यभरात तिच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.विशेष म्हणजे ज्यावेळी तिने ठाणे कोर्टात आपली बाजू मांडली त्यावेळी तिला कसलाही पश्चाताप झाला नसल्याचे तीच्या चेहऱ्यावरून दिसत होते.

त्यामुळे याच्यापुढे सोशल मीडियावर व्यक्त होताना प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.