उद्धव ठाकरेंनी आपले शब्द मागे घ्यावेत, जाहीर माफी मागावी, देवेंद्र फडणवीस

उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे शब्द मागे घेतले पाहिजे. असं ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्वीटरवरून केलंय.

उद्धव ठाकरेंनी आपले शब्द मागे घ्यावेत, जाहीर माफी मागावी, देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांचं ट्वीट काय?
Image Credit source: social media
| Updated on: Oct 07, 2022 | 3:33 PM

नागपूर : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासारख्या नेत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या दीड वर्षांच्या नातवाचे नाव घ्यावे, हे अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्र कुठे चालला आहे, याचे चिंतन केले पाहिजे. खरं तर त्यांनी जाहीरपणे आपले शब्द मागे घेतले पाहिजे, असं ट्वीट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलंय. दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे नातू आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे पुत्र रुद्राश शिंदे यांचा उल्लेख आपल्या भाषणात केला.

ठाकरेंनी शिंदे कुटुंबावरच टीका केली. ते म्हणाले, बाप मंत्री, कार्ट खासदार आणि आता रुद्राश नगरसेवक… असे त्याला आधी शाळेत तर जाऊ द्या…

Live

Municipal Election 2026

09:12 PM

आम्हाला हॉटेल पॉलिटिक्स करण्याची गरज नाही - अमेय घोले

07:54 PM

उल्हासनगरमध्ये अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांचा शिवसेनेत प्रवेश  

07:36 PM

नवा महापौर निवडीपर्यंत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमध्येच राहणार

07:31 PM

भाई जगताप यांना काँग्रेसची कारणे दाखवा नोटीस

07:48 PM

पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक

07:18 PM

सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका

या ठाकरे यांच्या वक्तव्याचा खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना भावनिक पत्र लिहतं उत्तर दिलं. अत्यंत व्यथित मनानं उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित असल्याचं ते म्हणाले.

त्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनीही उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. आतात यात देवेंद्र फडणवीस यांचीही भर पडली.

फडणवीस त्यांच्या ट्वीटममध्ये म्हणतात,उद्धव ठाकरे हे नेते आहेत. त्यांच्यासारख्या नेत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातवाचं नाव घ्यावं, हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्र कुठं चालला याचं चिंतन केलं पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे शब्द मागे घेतले पाहिजे. असं ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्वीटरवरून केलंय.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नातवावर टीका केल्यानंतर शिंदे गटाकडून जोरदार टीका केली आहे. त्यात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली. त्यामुळं आता उद्धव ठाकरे यांच्याकडून काही उत्तर दिलं जात का, हे पाहावं लागेल.