AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VHT Final : विदर्भ चॅम्पियन होण्यापासून एक पाऊल दूर, फायनलमध्ये सौराष्ट्रचं आव्हान, कोण जिंकणार?

VHT Final Vidararbha vs Saurashtra Live Streaming : विजय हजारे ट्रॉफी कोण जिंकणार? हे रविवारी 18 जानेवारीला ठरणार आहे. सौराष्ट्रसमोर अंतिम सामन्यात विदर्भाचं आव्हान असणार आहे.

VHT Final : विदर्भ चॅम्पियन होण्यापासून एक पाऊल दूर, फायनलमध्ये सौराष्ट्रचं आव्हान, कोण जिंकणार?
Vidarbha vs Saurashtra VHT Final Live StreamingImage Credit source: Bcci Domestic X Account
| Updated on: Jan 18, 2026 | 1:58 AM
Share

अखेर 118 सामन्यानंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील 2025-2026 या मोसमातील अंतिम सामन्यात कोणते 2 संघ भिडणार? हे स्पष्ट झालं आहे. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात विदर्भ विरुद्ध सौराष्ट्र यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. विदर्भाने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक दिली आहे. तसेच विदर्भाचं गेल्या हंगामात चॅम्पियन होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं होतं. विदर्भाला गेल्या मोसमात उपविजेता म्हणून समाधान मानावं लागलं होतं. त्यामुळे आता विदर्भ चॅम्पियन होण्याची प्रतिक्षा संपवण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे. विदर्भाला अंतिम सामन्यात खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे सौराष्ट्र विदर्भाविरुद्ध अंतिम सामन्यात कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सौराष्ट्रने उपांत्य फेरीत पंजाबवर मात करत फायनलमध्ये धडक दिलीय. विदर्भाने उपांत्य फेरीत कर्नाटकाचा धुव्वा उडवत गेल्या मोसमातील अंतिम फेरीतील पराभवाची परतफेड केली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हर्ष दुबे याच्याकडे विदर्भाच्या नेतृत्वाची धुरा आहे. तर हार्विक देसाई सौराष्ट्रच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. उभयसंघात होणाऱ्या या महाअंतिम सामन्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.

विदर्भ विरुद्ध सौराष्ट्र अंतिम सामना कधी?

विदर्भ विरुद्ध सौराष्ट्र अंतिम सामना रविवारी 18 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे.

विदर्भ विरुद्ध सौराष्ट्र अंतिम सामना कुठे?

विदर्भ विरुद्ध सौराष्ट्र अंतिम सामना बंगळुरुतील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सीलेन्स ग्राउंड 1 मध्ये आयोजित करण्यात आला आहे.

विदर्भ विरुद्ध सौराष्ट्र अंतिम सामन्याला किती वाजता सुरुवात होईल?

विदर्भ विरुद्ध सौराष्ट्र अंतिम सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 1 वाजता टॉस होईल.

विदर्भ विरुद्ध सौराष्ट्र अंतिम सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

विदर्भ विरुद्ध सौराष्ट्र अंतिम सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल. तर जिओहॉटस्टार एपद्वारे अंतिम सामना मोबाईल आणि लॅपटॉपवर पाहता येईल.

विदर्भ महाअंतिम सामन्यासाठी सज्ज

दोघांच्या कामगिरीकडे लक्ष

दरम्यान अंतिम सामन्यात सौराष्ट्रचा विश्वराज सिंह जडेजा आणि विदर्भाच्या अमन मोखाडे या दोघांच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. विश्वराजने 127 चेंडूत केलेल्या 165 धावांच्या खेळीच्या जोरावर सौराष्ट्रने पंजाबवर सहज विजय मिळवला होता. तर अमन मोखाडेने कर्नाटक विरुद्ध उपांत्य फेरीत 122 सामन्यांमध्ये 138 धावांची खेळी केली होती. त्यामुळे हे दोघे अंतिम क्रिकेट सामन्यात काय कमाल करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

रिकाम्या खुर्च्या मतदान कशा करू शकतात? उद्धव ठाकरेंचा महायुतीला सवाल
रिकाम्या खुर्च्या मतदान कशा करू शकतात? उद्धव ठाकरेंचा महायुतीला सवाल.
आमचे 54 नगरसेवक फोडले तरीही 65 नगरसेवक जिंकले, हीच शिवसेनेची खरी ताकद
आमचे 54 नगरसेवक फोडले तरीही 65 नगरसेवक जिंकले, हीच शिवसेनेची खरी ताकद.
शिंदेनी हॉटेलमध्ये नगसेवक का ठेवले? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
शिंदेनी हॉटेलमध्ये नगसेवक का ठेवले? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.
“तुम्ही सत्तेत बसा, आम्ही बघतोच”किशोरी पेडणेकरांचा महायुतीला थेट इशारा
“तुम्ही सत्तेत बसा, आम्ही बघतोच”किशोरी पेडणेकरांचा महायुतीला थेट इशारा.
निकालाच्या दुसऱ्याच दिवशी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर
निकालाच्या दुसऱ्याच दिवशी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर.
बीएमसी निवडणुकीच्या स्ट्राईक रेटमध्येही भाजपची बाजी
बीएमसी निवडणुकीच्या स्ट्राईक रेटमध्येही भाजपची बाजी.
मुंबईचा महापौर हा... भाजपचे मंत्री नितेश राणेंनी दिले मोठे संकेत
मुंबईचा महापौर हा... भाजपचे मंत्री नितेश राणेंनी दिले मोठे संकेत.
अमरावतीत भाजप कुबड्या... काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा हल्लाबोल
अमरावतीत भाजप कुबड्या... काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा हल्लाबोल.
'संजय राऊत यांच्या भोंग्यामुळेच ठाकरेंची अवगती होतेय'
'संजय राऊत यांच्या भोंग्यामुळेच ठाकरेंची अवगती होतेय'.
महापालिका निकालानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; त्या गोष्टीवर ठेवलं बोट
महापालिका निकालानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; त्या गोष्टीवर ठेवलं बोट.