Nagpur Rain: ऐन पावसाळ्यात नागपुरात पाणीसंकट; मध्य प्रदेशातील अतिवृष्टीमुळे कन्हान नदीला पूर; पंपिंग स्टेशन बुडाले

मुसळधार पावसाचा फटका नागपूर परिसरातील अनेक गावांना बसला आहे. अनेक नदीकाठच्या गावांतील शेतीपिकांचेही नुकसान झाले आहे. या परिस्थितीतच कन्हान नदीच्या पुरात पंपिंग स्टेशन पाण्यात बुडाले असल्याने पाणी पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना वेट अँड वॉच करावं लागणार आहे.

Nagpur Rain: ऐन पावसाळ्यात नागपुरात पाणीसंकट; मध्य प्रदेशातील अतिवृष्टीमुळे कन्हान नदीला पूर; पंपिंग स्टेशन बुडाले
गजानन उमाटे

| Edited By: महादेव कांबळे

Aug 17, 2022 | 7:23 AM

नागपूरः गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) राज्यासह देशाभरातील अनेन नद्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक धरणातून पाणीसाठा वाढल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे धरणाखालील नद्यांना पूर येऊन अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे. अशीच परिस्थिती सध्या नागपुरात झालेली दिसून येत आहे. मध्य प्रदेशातील अतिवृष्टीमुळे कन्हान नदीला पूर आला आहे. त्यामुळे नागपूरातील पाणीपुरवठा विस्कळीत (Shut off water supply) झाला आहे. नागपूर शहराला पाणी पुरवठा करण्यात येते तेच पंपिंग स्टेशन पाण्यात बुडाल्याने नागपूर शहराला मध्य प्रदेशात होणाऱ्या पावसाचा जोरदार फटका बसला आहे. मध्य प्रदेशात (Madhya Peadesh) सध्या पाऊस सुरु असल्याने कन्हान नदीला पूर आला आहे. या पुरामुळे पंपिंग स्टेशन पाण्याखाली गेले आहे. ऐन पावसाळ्यात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.

मध्य प्रदेशातील पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील नवेगाव खैरी धरणाचे 16 दरवाजे उघडण्यात आले आहे. खैरी धरणाचे दरवाजा उघडल्यामुळे धरणाखाली असणाऱ्या नद्यांना पूर आला आहे.

पुराचा फटाका नदीकाठच्या गावांना

या पुराचा फटाका नदीकाठी असणाऱ्या गावांना बसला आहे. नदीकाठच्या शेतामधून पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. कन्हान नदीला आलेल्या पुरामुळे नागपुरातील पाणी समस्या तीव्र झाली आहे. त्यामुळे पुराचे पाणी कमी झाल्यानंतरच नागपुरकरांना पाणी मिळण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेशात अतिवृष्टी

मागील काही तासांपासून मध्य प्रदेशात जोरदार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे मध्य प्रदेशात होणाऱ्या पावसाचा फटका नागपूरकरांना बसला आहे. जोरदार पाऊस झाल्याने नदी, धरणातील पाणीसाठा वाढवण्यात आल्यानेच नागपुरकरांना त्याचा जोरदार फटका बसला आहे. नवेगाव खैरी धरणाचे सर्व दरवाजे 1.5 मिटरने उघडलs गेले आहेत. होणाऱ्या पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदीला पूर आला आहे, आणि त्यामुळे नागपूर शहराला होणारा पाणीपुरवठा करणारे पंपिंग स्टेशन पुराच्या पाणीखाली गेले आहे. त्यामुळे नागपुकर पाण्याच्या समस्येमुळे चिंताग्रस झाले आहेत.

कन्हान नदीच्या पुरात पंपिंग स्टेशन

मुसळधार पावसाचा फटका नागपूर परिसरातील अनेक गावांना बसला आहे. अनेक नदीकाठच्या गावांतील शेतीपिकांचेही नुकसान झाले आहे. या परिस्थितीतच कन्हान नदीच्या पुरात पंपिंग स्टेशन पाण्यात बुडाले असल्याने पाणी पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना वेट अँड वॉच करावं लागणार आहे.

अर्ध्या शहरातील पाणीपुरवठा आज बंद

गेल्या काही तासांपासून मध्य प्रदेशात आणि नागपूर परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्याचा फटका शेतीसह नागरिकांना बसला आहे. मध्य प्रदेशात सध्या पाऊस सुरु असल्याने कन्हान नदीला पूर आला आहे. या पुरामुळे पंपिंग स्टेशन पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे अर्ध्या शहरातील पाणीपुरवठा आज बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले असून दोन दिवस अर्ध्या नागपूरातील पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें