Rohit Pawar: राष्ट्रवादीत पुन्हा मोठा भूकंप? रोहित पवार काँग्रेसमध्ये की वेगळ्या वाटेवर? महाराष्ट्र दौऱ्यातून काय केली चाचपणी?, राष्ट्रवादीच्या बैठकीपूर्वीच घडामोड

Rohit Pawar: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक मोठे वळण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आमदार रोहित पवार हे पार्टी लाईनपेक्षा वेगळी भूमिका घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्र दौऱ्यातून त्यांनी मोठी चाचपणी केल्याची माहिती समोर येत आहे. काय आहे याविषयीची अपडेट?

Rohit Pawar: राष्ट्रवादीत पुन्हा मोठा भूकंप? रोहित पवार काँग्रेसमध्ये की वेगळ्या वाटेवर? महाराष्ट्र दौऱ्यातून काय केली चाचपणी?, राष्ट्रवादीच्या बैठकीपूर्वीच घडामोड
रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, मोठी चाचपणी
| Updated on: Nov 26, 2026 | 8:04 AM

गजानन उमाटे, प्रतिनिधी, टीव्ही9 मराठी: शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी घडामोड सुरू आहे. राज्याच्या राजकारणात पुन्हा एक मोठे राजकीय वळण येण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार रोहित पवार हे पार्टी लाईनपेक्षा वेगळी भूमिका घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्र दौऱ्यातून त्यांनी मोठी चाचपणी केल्याची माहिती समोर येत आहे. आज खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात मुंबईतील वाय. बी. चव्हाण सभागृहात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. नागपूरमध्ये रोहित पवार यांनी एक गोपनीय बैठक घेतल्याची माहिती यापूर्वी आली होती. आता या नवीन दाव्यामुळे राष्ट्रवादीसमोर पक्षातील बंड थोपवण्याचे मोठे आव्हान आहे.

विदर्भासह महाराष्ट्रात रोहित पवारांकडून चाचपणी

Loading...

सूत्रांच्या माहितीनुसार, पक्ष नेतृत्त्वाला विश्वासात न घेता आ. रोहीत पवार यांची विदर्भासह राज्याच्या इतर भागात चाचपणी केली. काँग्रेसमधे गेल्यास किंवा वेगळी भुमिका घेतल्यास राष्ट्रवादी पवार गटातील कोण आपल्यासोबत येऊ शकतं, हे जाणून घेण्यासाठी रोहीत पवार यांची विदर्भासह इतर भागात चाचपणी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार यांच्या आंदोलनातून वरिष्ठ नेत्यांचे फोटो आणि पक्षाचा लोगो गायब असल्याने जोरदार चर्चा रंगली होती. त्यानंतर ही माहिती समोर येत आहे.

तर पक्षात मोठी दुफळी?

शरद पवार गट एनडीए सोबत गेल्यास पक्षातील काँग्रेस विचाराचे नेते आपल्यासोबत यावे, यासाठी रोहित पवार यांचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. पवार गेल्या काही दिवसांत विविध भागाचा दौरा करून स्थानिक पदाधिकार्‍यांच्या मनात नेमकं काय? याबाबत चाचपणी करत आहेत. भाजपसोबत जाण्यास तयार नाही, अशे राष्ट्रवादीतील स्थानिक नेते, माजी आमदार, पदाधिकारी रोहित पवार यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, अकोला सह विविध जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांबाबत रोहित पवार आणि त्यांच्या टीमकडून चाचपणी करण्यात येत आहे.

पवार गट एनडीए सोबत गेल्यास भाजपकडे असलेल्या विधानसभा/ लोकसभा मतदारसंघातील पवार गटाचे काही दावेदार रोहित पवार यांच्यासोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी पवार गट एनडीए सोबत गेल्यास पक्षातील नेत्यांनध्ये फुट पाडून आपली ताकद वाढण्याचे रोहीत पवार यांचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

आज मुंबईत पक्षाची बैठक, गुप्त बैठकीचे पडसाद

दरम्यान आज मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक होणार आहे. खासदार सुप्रिया सुळे या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तर दोन दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांनी नागपूरमध्ये राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. याविषयी काल माध्यमांशी बोलताना हा हास्यास्पद दावा असल्याची प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली होती. दरम्यान आजच्या बैठकीत या गोपनीय बैठकीचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us