पेट्रोलच्या दरवाढीने जनता हैराण, रामदेवबाबांचं एकच वाक्य, म्हणाले हे स्वप्न…

| Updated on: Oct 23, 2021 | 8:30 PM

मागील कित्येक महिन्यांपासून देशात इंधन दरवाढ होत आहे. पेट्रोल तसेच डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे जनता हैराण आहे. विरोधक केंद्र सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर योगगुरु रामदेवबाबा यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.

पेट्रोलच्या दरवाढीने जनता हैराण, रामदेवबाबांचं एकच वाक्य, म्हणाले हे स्वप्न...
RAMDEV BABA
Follow us on

नागपूर : मागील कित्येक महिन्यांपासून देशात इंधन दरवाढ होत आहे. पेट्रोल तसेच डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे जनता हैराण आहे. विरोधक मोदी सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर योगगुरु रामदेवबाबा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पेट्रोलचे दर कमी होण्याचं हे स्वप्न कधी ना कधी पूर्ण होणार, असा विश्वास व्यक्त केलाय. ते नागपुरात बोलत होते.

दर कमी होण्याचं स्वप्न कधी ना कधी पूर्ण होणार

रामदेवबाबा 23 ऑक्टोबर रोजी नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण, भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचा सामना तसेच अन्य विषयांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना त्यांनी इंधन दरवाढीवरदेखील प्रतिक्रिया दिली. पेट्रोलचे दर कमी होण्याचं स्वप्न कधी ना कधी पूर्ण होणार आहे, असे रामदेव बाबा म्हणाले. पेट्रोल डिझेल दरवाढीवर बोलताना वरील एक वाक्य म्हणत त्यांनी भविष्यात इंधनाचे भाव कमी होतील असा आशावाद व्यक्त केला.

बॅालिवूडमध्ये नशा करण्याचं विनाशकारी तंत्र सुरु

तसेच पुढे बोलताना त्यांनी बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणावरदेखील प्रतिक्रिया दिली. “बॅालिवूडमध्ये नशा करण्याचं विनाशकारी तंत्र सुरु आहे. हे भावी पिढीसाठी धोकादायक आहे. सर्व इंडस्ट्रीने मिळून आपला कचरा साफ करायला हवा. ड्रग्ज त्यांच्यासाठीच आत्मघातकी आणि धोकादायक असेल,” असे रामदेवबाबा म्हणाले.

सामना होणे भारताच्या हिताच्या विरुद्ध

रामदेवबाबा यांनी 24 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान टी-20 सामन्यावरदेखील प्रतिक्रिया दिली. सध्याच्या स्थितीत भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचाच सामना होणे भारताच्या हिताच्या विरुद्ध आहे. एकीकडे आतंकी खेळ आणि दुसरीकडे क्रीकेटचा खेळ सुरु आहे. या दोन्ही गोष्टी सोबत चालू शकत नाहीत, असे रामदेव बाबा म्हणाले.

98 टक्के आजाराचं समाधान आयुर्वेदात

तसेच यावेळी बोलताना रामदेबाबा यांनी योग आणि आयुर्वेदाचे महत्त्व पटवून सांगितले. ॲलोपॅथीच्या तुलनेत योग आणि आयुर्वेद आताही सर्वश्रेष्ठ आहे. एमर्जन्सी उपाय आणि ॲापरेशन सोडल्यास 98 टक्के आजाराचं समाधान आयुर्वेदात आहे. नागपूर मिहानमधील पतंजलीचा प्रकल्प याच वर्षी सुरु व्हावा यासाठी आम्ही वेगानं काम करतोय. मिहानमध्ये उद्योग सुरु करण्याचं आमचं स्वप्न याच वर्षी साकार होणार आहे. आपण सर्वजण एकाच पुर्वजांची संतान आहोत. अध्यात्मिक राष्ट्रवादाला घेऊन देश असाच वाटचाल करत राहिला तर भारत जगाचं नेतृत्व करु शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

इतर बातम्या :

‘नम्र विनंती, आम्हाला गांजाची शेती करु द्या’, चंद्रपुरातील शेतकऱ्याची सरकारकडे विचित्र मागणी, ग्रामसभेने अर्ज स्वीकारला, पण…

T20 WC IND vs PAK : चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये केलेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ न देणे गरजेचं, अन्यथा विजय अवघड

फक्त राज ठाकरेच नाही तर आई आणि बहिणीलाही कोरोना, नेमकं काय म्हणाले डॉ. जलील पारकर?

(yog guru ramdev baba comment on petrol and diesel price hike said dream will come true)