फक्त राज ठाकरेच नाही तर आई आणि बहिणीलाही कोरोना, नेमकं काय म्हणाले डॉ. जलील परकार?

राज यांच्यासोबतच त्यांची बहीण आणि आई यांनादेखील कोरोनाची लागण झालेली आहे. सध्या राज यांच्यावर डॉ. जलील परकार उपचार करत असून तीन तासानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. राज ठाकरे यांच्या प्रकृतीविषयी खुद्द डॉ. परकार यांनी ही माहिती दिलीय.

फक्त राज ठाकरेच नाही तर आई आणि बहिणीलाही कोरोना, नेमकं काय म्हणाले डॉ. जलील परकार?
raj thackeray
Follow us
| Updated on: Oct 23, 2021 | 10:13 PM

मुंबई : राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झालेली आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ते उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. सध्या मिळालेल्या माहितीनुसार राज यांच्यासोबतच त्यांची बहीण आणि आई यांनादेखील कोरोनाची लागण झालेली आहे. सध्या राज यांच्यावर डॉ. जलील परकार यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात येस असून तीन तासानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. राज ठाकरे यांच्या प्रकृतीविषयी खुद्द डॉ. परकार यांनी ही माहिती दिलीय.

राज ठाकरे तीन तासांत घरी जाणार 

“त्यांची प्रकृती चांगली आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या बहिणीलाही कोरोनाची लागणी झाली आहे. दोघेही रुग्णालयात दाखल झाले आहेत. आम्ही त्यांना मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेल दिले आहे. ते तीन तासांत घरी जातील. त्यांना घरीच क्वॉरन्टाईन केले जाईल. त्यांच्या आईदेखील रात्री रुग्णालयात आल्या होत्या. त्यांनाही आम्ही अँटिबॉडी कॉकटेल दिले आहे. तीन तासानंतर राज यांना घरी सोडले जाईल,” अशी माहिती डॉ. जलील परकार यांनी दिली आहे.

मोनोक्लोनल अँटिबॉडी काय आहे ?

मोनोक्लोनल अँटिबॉडी हे औषध कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येत आहे. यामध्ये दोन अँटिबॉडीजचे मिश्रण आहे. लीलावती रुग्णालयात हेच औषध राज ठाकरे यांना देण्यात येत आहे. या औषधामुळे त्यांना रुग्णालयात ठेवण्याची गरज नाही. तसेच ते लवकर बरे होतील.

लसीचे दोन्ही डोस घेतलेले असताना कोरोनाची लागण

राज ठाकरे यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. असे असले तरी त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत होती. तर आता लस घेतललेली असूनदेखील त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय.

मनसेचे सर्व मेळावे स्थगित

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच सक्रिय झाले होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्या नाशिक, पुणे या शहरांतील दौरे वाढले आहेत. 23 ऑक्टोबर रोजी भांडूपमध्ये मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा स्थगित करण्यात आला आहे. तसेच राज यांचा पुणे दौरादेखील पुढे ढकलण्यात आलाय. प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता राज यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

महपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सक्रिय

दरम्यान, आगामी काळात महापालिकेच्या निवडणुका लागणार आहेत. पुणे तसेच नाशिक पालिकेत मनसेचा झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्न केला जातोय. कार्यकर्ता मेळावा, नव्या शाखांची सुरुवात अशा माध्यमातून मनसेकडून पक्षविस्तार करण्यात येत आहे. राज ठाकरेदेखील यामध्ये सक्रिय झालेले आहेत. त्यांनी पुणे तसेच नाशिक आणि मुंबईत वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींकडे लक्ष केंद्रित केलंय. मात्र सध्या त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे या सर्व कार्यक्रमाला ब्रेक मिळाला आहे.

इतर बातम्या :

VIDEO: छगन भुजबळ शिवसेनेत असते तर नक्कीच सर्वोच्च स्थानी गेले असते; संजय राऊतांचं मोठं विधान

अजितदादांनी जाहीर केलेल्या सर्वच साखर कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करा; चंद्रकांत पाटलांनी ललकारले

नाशिक महापौर पदाचा उमेदवार कोण, आमदार कांदेंना महाराष्ट्राबाहेरून धमक्या, राऊतांचे दिवाळीआधीच फटाके!

(mns president raj thackeray tested corona positive admitted to lilavati hospital know what doctor says)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.