AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाना पटोलेंच्या कारचा अपघात, ट्रकची जोरदार धडक, घातपाताचा आरोप

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौ-यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या कारला एका ट्रकने जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालं नाही. कारला धडक बसली तेव्हा कारमधील सर्वजण खाली उतरल्याने कोणालाच इजा झाली नाही. मात्र यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

नाना पटोलेंच्या कारचा अपघात, ट्रकची जोरदार धडक, घातपाताचा आरोप
| Updated on: Apr 10, 2024 | 1:04 PM
Share

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौ-यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या कारला एका ट्रकने जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालं नाही. कारला धडक बसली तेव्हा कारमधील सर्वजण खाली उतरल्याने कोणालाच इजा झाली नाही. मात्र यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नाना पटोले हे या अपघातामधून थोडक्यात बचावले आहेत. अपघाताची माहिती मिळातच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. पुढील तपास सुरू आहे. ट्रकचालकाचे ट्रकवरील नित्रंयण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

आमच्या वाहनाला एका ट्रकने मुद्दाम धडक दिली असा गंभीर आरोप अपघातानंतर नाना पटोले यांनी केला आहे. आम्ही तर यातून बचावलो, सुखरूप राहिलो पण गाडीचं बरंच नुकसान झालं. जनतेच्या आशीर्वादाने आम्ही सुखरूप राहिलो, कोणी काळजी करू नये असे पटोले यांनी स्पष्ट केले. मात्र हा अपघात म्हणजे घातपात होता की काय याचाही पोलिस तपास करतील असेही पटोले यांनी नमूद केले आहे.

विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का ?

दरम्यान या अपघातानंतर आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे. प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही यासंदर्भात ट्विट केलं आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का ? असा सवालच लोंढे यांनी नाना पटोलेंच्या अपघातानंतर विचारला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौ-यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का ? अशी शंका आहे.

मायबाप जनतेच्या आशीर्वादाने नाना पटोले साहेबांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...