INS Vikrant Case : भाजपाच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि खजिनदाराची चौकशी करा; नाना पटोले यांची मागणी

| Updated on: Apr 12, 2022 | 6:19 PM

INS Vikrant Case : आयएनएस विक्रांतचा निधी पक्षाला दिल्याचं भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या वकिलांनी कोर्टाला सांगितल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमय्या आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.

INS Vikrant Case : भाजपाच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि खजिनदाराची चौकशी करा; नाना पटोले यांची मागणी
नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: आयएनएस विक्रांतचा निधी (INS Vikrant Case) पक्षाला दिल्याचं भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या वकिलांनी कोर्टाला सांगितल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी सोमय्या आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. युद्धनौका आयएनएस ‘विक्रांत बचाव’ मोहिमेच्या नावाखाली भाजपा व किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी सर्वसामान्य जनतेकडून जमा केलेल्या पैशांचा हिशोब जनतेला दिला पाहिजे. किरीट सोमय्या यांनी जमा केलेला निधी भारतीय जनता पक्षाला दिला असे सांगितले आहे. सर्वसामान्य जनतेचा हा विश्वासघात असून तो गंभीर गुन्हा सुद्धा आहे. सोमय्यांनी हा निधी भारतीय जनता पक्षाला दिला असेल तर ह्या पक्षाची व या पक्षाच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्ष तसेच खजिनदाराची चौकशी करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

आयएनएस ‘विक्रांत बचाव’च्या मोहिमेअंतर्गत 140 कोटी रुपये जमा करण्याचा किरीट सोमय्या यांचा निर्धार होता. त्यासाठी किरीट सोमय्या व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी हातात डबे घेऊन सर्वसामान्य लोकांकडून ‘सेव्ह विक्रांत’च्या नावाखाली रोख पैसे जमा केले, या पैशांची कोणतीही पावती लोकांना दिलेली नाही. त्यासाठी कोणतीही परवानगी घेतल्याचेही स्पष्ट झालेले नाही. जनतेकडून जमा केलेली रक्कम राजभवन, राष्ट्रपतीभवन अथवा संरक्षण मंत्रालय यापैकी कोणाकडेही जमा न करता जनतेचा हा पैसा सोमय्या यांनी भारतीय जनता पक्षाकडे जमा केल्याचे सोमय्या यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात सांगितल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमात आलेल्या आहेत. हा जनतेचा विश्वासघात असून खोटे बोलून वसुली केली आहे. जर भारतीय जनता पक्षाने हा पैसा घेतला असेल तर तोही गुन्हाच आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष व त्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांवर कारवाई झाली पाहिजे. ‘विक्रांत बचाव’चा पैसा हडपणाऱ्या भाजपलाही सहआरोपी करा, असं नाना पटोले म्हणाले.

रोख पैसा गेला कुठे?

‘विक्रांत बचाव’च्या नावाखाली भाजपाने जनतेच्या भावनेशी खेळ केला आहे. सोमय्या यांच्या वकिलाच्या दाव्यानुसार 11 हजार रुपये जमा केल्याचे समजते. पण ही रक्कम यापेक्षा नक्कीच मोठी आहे. तो रोख पैसा भाजपाने कसा घेतला व त्याचा कशासाठी वापर केला हे जनतेला जाणून घ्यायचा अधिकार आहे. ‘विक्रांत बचाव’च्या नावाखाली केलेल्या वसुली प्रकरणी सोमय्या यांच्याबरोबर भाजपाचीही चौकशी करुन कडक कारवाई झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

INS Vikrant Case : विक्रांत घोटाळ्यात नाव येताच किरीट सोमय्यांना गोपीनाथ मुंडेंची आठवण; सोमय्या नेमकं काय म्हणाले?

INS Vikrant Case : ‘किरीट सोमय्या पळपुटं नेतृत्व नाही, ते चौकशीला सामोरं जातील’, प्रवीण दरेकरांचं वक्तव्य, सरकारवर निशाणा

Kirit somaiya : सोमय्यांना सलग दुसरा मोठा झटका, मुलाचा अटकपूर्व जामीन अर्जही फेटाळला