sukhbir singh badal : माजी उपमुख्यमंत्र्यांवर तलवारीने हल्ला; नांदेड पोलिसांची पहिली मोठी कारवाई, पुण्याच्या वकिलावर गुन्हा
माजी उपमुख्यमंत्र्यांवर तलवारीने हल्ला करणाऱ्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला करणाऱ्याच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुखवीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये गुरुद्वाराजवळ हल्ला झाला होता. सुखबीर सिंह बादल यांच्यासोबत त्यांच्या पत्नी हरसिमरत कौर बादल या देखील होत्या. सुखवीर सिंह बादल यांच्यावर हल्ला केल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. या प्रकरणी नांदेडच्या मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल हे त्यांच्या पत्नी खासदार हरसिमरत कौर बादल यांच्यासोबत नांदेडच्या श्री हजूर साहिब गुरुद्वारात गेले होते. त्याचवेळी त्यांच्यावर पुण्यातील वकिलाने तलवारीने हल्ला केला. या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची दखल घेत हल्ल्यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांनी या प्रकरणाची पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेतली आहे. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुखवीर सिंग बादल यांच्याशी फोनवरूनही चर्चा केली आहे. त्यानंतर नांदेड पोलिसांनी तातडीने कारवाईला सुरुवात केली. सध्या सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना सुखबीर सिंह बादल यांना लवकरच एअरलिफ्ट करण्यात येणार आहे. त्यांना पुढील उपचारासाठी पंजाबमध्ये नेण्यात येणार आहे.
आरोपीला तातडीने अटक
नांदेड पोलिसांनी तातडीने तात्काळ अटक केली आहे. सुखबीर सिंग बादल यांची प्रकृती चांगली आहे. सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला करणारा 62 वर्षीय व्यक्ती वकील आहे. जसपालसिंग असे आरोपीचे नाव आहे. जसपालसिंग पुण्यात वकील होता. त्यानंतर मागील 2 वर्षांपासून नांदेडच्या मातासाब गुरुद्वारात सेवा करत होता. त्याने हल्ला केल्यानंतर तातडीने अटक केली आहे.
माजी उपमुख्यमंत्र्यांवर हल्ला प्रकरणी पहिली कारवाई
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी नांदेडच्या मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोर आरोपीविरोधात कलम 307( जीवघेणा हल्ला करणे ), 353 ( शासकीय कामात अडथळा ) ipc आणि 4/25 आर्म ऍक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी जसपालसिंग याच्यावर खुनाचा प्रयत्न, धोकादायक शस्त्राने दुखापत, शासकीय सेवकाला कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी गंभीर दुखापत, शस्त्र कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.