ऑनलाईन शिक्षणाचा कंटाळा आला, शाळेची आठवण येतेय, नांदेडच्या चिमुकलीची मुख्यमंत्र्यांना भावनिक साद

शाळेत शिकवणारे शिक्षक रवी ढगे यांनी जागतिक टपाल दिनानिमित्त पत्रलेखनाचा उपक्रम घेतला होता. (Nanded Student Write letter to CM Uddhav Thackeray)

ऑनलाईन शिक्षणाचा कंटाळा आला, शाळेची आठवण येतेय, नांदेडच्या चिमुकलीची मुख्यमंत्र्यांना भावनिक साद

नांदेड : “आम्ही घरी बसून कंटाळलो आहोत. आम्हाला शाळेची आठवण येतेय. त्यामुळे लवकरात लवकर शाळा सुरु करा,” अशी भावनिक साद नांदेडमधील एका चिमुकलीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घातली आहे. संस्कृती जाधव असं त्या विद्यार्थिनीचं नाव आहे. (Nanded Student Write letter to CM Uddhav Thackeray for Restart School)

नांदेडमधील लोहा तालुक्यातील मारतळा या ठिकाणी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आहे. या शाळेत शिकणाऱ्या संस्कृती जाधव या विद्यार्थिनीने मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिलं आहे. या शाळेत शिकवणारे शिक्षक रवी ढगे यांनी जागतिक टपाल दिनानिमित्त पत्रलेखनाचा उपक्रम घेतला होता.

या उपक्रमात संस्कृतीने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहित शाळा सुरु करण्याची मागणी केली आहे. “आम्ही घरी बसून कंटाळलो आहोत. आम्हाला शाळेची आठवण येतेय. ऑनलाईन शिक्षण घेऊन कंटाळा आला आहे, त्यामुळे शाळा लवकरात लवकर सुरु करा,” असे संस्कृतीने पत्रात म्हटलं आहे. सध्या संपूर्ण शाळेत तिच्या पत्राचीच चर्चा सुरु आहे.

संस्कृतीच्या पत्राची चर्चा शिक्षकांसह पालकही करत आहे. या पत्रावर उद्धव ठाकरे काय उत्तर देणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (Nanded Student Write letter to CM Uddhav Thackeray for Restart School)

संबंधित बातम्या : 

नवरात्रोत्सवात सोशल डिस्टन्सिंग, कोरोना नियमांचे पालन करा, अजित पवारांचं जनतेला आवाहन

मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवण्याच्या याचिकेवर 27 ऑक्टोबरला सुनावणी

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *