अशोक चव्हाणांकडून काही दिवसांपूर्वी घोषणा, नांदेडमध्ये ऑक्सिजनचा दुसरा टॅंक दाखल

| Updated on: Apr 15, 2021 | 12:10 PM

येत्या दोन दिवसात त्याचा वापर करण्यास सुरुवात केली जाईल, असे बोललं जात आहे. (Nanded second oxygen tank in government hospital)

अशोक चव्हाणांकडून काही दिवसांपूर्वी घोषणा, नांदेडमध्ये ऑक्सिजनचा दुसरा टॅंक दाखल
फोटो प्रातनिधीक
Follow us on

नांदेड : राज्यात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक सरकारी रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. नांदेडच्या सरकारी रुग्णालयात ऑक्सिजनचा दुसरा टँक दाखल झाला आहे. येत्या दोन दिवसात त्याचा वापर करण्यास सुरुवात केली जाईल, असे बोललं जात आहे. (Nanded second oxygen tank in government hospital)

अशोक चव्हाणांकडून ऑक्सिजनचा साठा वाढवण्याची घोषणा

नांदेड शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागतो. तर गंभीर रुग्णांना रेमडेसिवर यासह प्रतिकारशक्ती वाढविणारी औषधी द्यावी लागत आहेत. मात्र रुग्णालयात मागणीनुसार ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने अनेक रुग्णांना त्याचा फटका बसत आहे. ही परिस्थिती बघता नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडच्या सरकारी रुग्णालयात ऑक्सिजनचा साठा वाढवण्याची घोषणा केली होती.

दोन दिवसात वापर सुरु

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नांदेडमध्ये ऑक्सिजनची मागणी मोठया प्रमाणात वाढली आहे. या घोषणेनुसार नांदेडमध्ये ऑक्सिजनचा अधिक साठा करण्यासाठी 20 KL क्षमतेचा एक मोठा टॅंक नांदेडला दाखल झाला आहे. या टॅंकच्या फिटींगनंतर दोन दिवसांत त्याचा वापर सुरु होणे अपेक्षित असल्याचे बोललं जात आहे.

नांदेडमध्ये ऑक्सिजन अभावी रुग्णांची हेळसांड

दरम्यान काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा, बेडच्या कमतरतेमुळे रुग्णांना घरी पाठवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. मंगळवारी 6 एप्रिलला नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जम्बो कोविड सेंटरला मान्यता दिली होती. या कोविड सेंटरमध्ये एकाचवेळी 200 रुग्णांवर उपचार केले जातील असे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून सुरू होते.

मात्र अचानक या ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा अपुरा पडू लागला होता. तसेच या कोव्हिड सेंटरमध्ये बेड उपलब्ध नसल्याची माहितीही समोर आली होती. यामुळे रुग्णांची अक्षरशः हेळसांड होत आहे. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्ण दगावण्याची शक्यताही वर्तवली जात होती. मात्र आता नांदेडच्या सरकारी रुग्णालयात ऑक्सिजनचा दुसरा टँक दाखल झाला आहे. (Nanded second oxygen tank in government hospital)

संबंधित बातम्या : 

मुंबईत पंचतारांकित हॉटेलचे रुग्णालयात रुपांतर, एका दिवसाचे शुल्क किती?

ना शववाहिनी मिळाली, ना मदत, माऊलीच्या पार्थिवासह कार चालवत मुलगी स्मशानभूमीत

शिवसेनेच्या रणरागिणीला कोरोनाने गाठलं, नाशिकच्या ज्येष्ठ नगरसेविका कल्पना पांडे यांचे कोरोनामुळे निधन