AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Corona | नाशिकमध्ये कोरोना रुग्ण वाढूनही चिंता कमी; कारण काय, त्यासाठी जाणून घ्या आजचा रिपोर्ट…!

नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज सोमवारी प्राप्त अहवालानुसार सद्यस्थितीत 10 हजार 982 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 768 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Nashik Corona | नाशिकमध्ये कोरोना रुग्ण वाढूनही चिंता कमी; कारण काय, त्यासाठी जाणून घ्या आजचा रिपोर्ट...!
CORONA TESTING
| Edited By: | Updated on: Jan 17, 2022 | 1:10 PM
Share

नाशिकः नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज सोमवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 12 हजार 38 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 10 हजार 982 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 768 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना (Corona) रुग्ण वाढूनही चिंता थोडी कमी आहे. कारण रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.43 टक्के आहे. त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगायचे कारण नाही. मात्र, कोरोना निर्बंध पाळावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.

येथे आहेत रुग्ण

उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 287, बागलाण 36, चांदवड 22, देवळा 19, दिंडोरी 337, इगतपुरी 83, कळवण 59, मालेगाव 55, नांदगाव 129, निफाड 625, पेठ 32, सिन्नर 279, सुरगाणा 36, त्र्यंबकेश्वर 24, येवला 33 असे एकूण 2 हजार 56 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 8 हजार 369, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 203 तर जिल्ह्याबाहेरील 354 रुग्ण असून असे एकूण 10 हजार 982 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 31 हजार 788 रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेल्या बाधित रुग्णांमध्ये नाशिक 220, बागलाण 35, चांदवड 35, देवळा 28, दिंडोरी 108, इगतपुरी 111, कळवण 32, मालेगाव 37, नांदगाव 80, निफाड 250, पेठ 13, सिन्नर 120, सुरगाणा 6, त्र्यंबकेश्वर 45, येवला 65 असे एकूण 1 हजार 185 पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 96.12 टक्के, नाशिक शहरात 94.95 टक्के, मालेगावमध्ये 95.69 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 92.98 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 95.43 टक्के इतके आहे. नाशिक ग्रामीणमध्ये कोरोनाने 4 हजार 252 जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 4 हजार 32, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 358 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 768 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

नाशिक जिल्ह्यात तब्बल दिवसाला तीन-तीन हजार रुग्ण सापडत असल्याने जिल्हा प्रशासन हादरून गेले आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत इशारा दिला आहे. कोविड विषयक नियमांचे पालन न केल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. हे सर्वांनी लक्षात घेण्याची गरज आहे. उपचाराची व्यवस्था निर्माण करण्यात प्रशासन कोणतीही कसर ठेवत नसताना नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करून आपली जबाबदारी सुद्धा पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. अन्यथा आगामी काळात निर्बंध अधिक कठोर करण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही, असा इशाराही दिला आहे.

इतर बातम्याः

महाराष्ट्र पक्षीमित्र संघटेला 40 वर्षे पूर्ण; आजवर 64 संमेलनांचे आयोजन, पर्यावरण चळवळीच्या अनोख्या कार्याला उजाळा…!

Nashik Jobs : घरबसल्या नोकरी मिळवा; नाशिकमध्ये ऑनलाईन रोजगार मेळावा, कसे व्हाल सहभागी?

Nashik Corona : नाशिक जिल्ह्यात 16 कोविड सेंटर सुरू; कुठे मिळतायत उपचार?

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.