Nashik Dargah Row : नाशिकमध्ये दर्ग्यावरुन वाद, हिंदू संघटनांची हनुमानाचं मंदिर बनवण्याची मागणी
Nashik Dargah Row : हिंदू समाजाच्या या विरोध प्रदर्शनामुळे सांप्रदायिक स्थिती निर्माण होईल असं म्हटलं जातय. त्यामुळे पोलिसांनी या संपूर्ण परिसरात घेराबंदी केली आहे. सोबतच लोकांना सर्तक राहण्यास सांगितलं आहे.

महाराष्ट्रात नाशिकमध्ये हिंदू संघटना एका दर्ग्यावरुन नाराज आहेत. त्यामुळे शहरात तणाव आहे. दर्गा अतिक्रमण करुन बांधण्यात आला आहे आणि हे अवैध आहे असं हिंदू संघटनांच म्हणणं आहे. हिंदू संघटनांनी या विरोधात मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शन करण्याचा प्लान बनवला आहे. तणाव वाढू शकतो, अशी शक्यता आहे. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलिसांनी दर्गा क्षेत्र छावणीमध्ये बदललं आहे.
हिंदू संघटनांच म्हणणं आहे की, हा दर्गा अवैध आहे. त्यामुळे तो तोडला पाहिजे. या जागी हनूमानाचं मंदिर बनवलं पाहिजे. सकल हिंदू समाजाची या दर्ग्यावरुन सतत विरोध प्रदर्शन सुरु आहेत. नाशिकमध्ये जमिनीवर बेकायद ताबा मिळवून त्या ठिकाणी दर्गा बांधलाय असं हिंदू समाजाच्या लोकांच म्हणणं आहे. हा दर्गा अवैध असून तो तोडला पाहिजे अशी मागणी करण्यात येतेय.
संपूर्ण परिसरात घेराबंदी
सकल हिंदू समाजाच्या लोकांची दर्ग्यावर जाऊन मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शन करण्याची योजना आहे. नाशिक पोलीस या प्रदर्शनामुळे Action मोडमध्ये आहेत. हिंदू समाजाच्या या विरोध प्रदर्शनामुळे सांप्रदायिक स्थिती निर्माण होईल असं म्हटलं जातय. त्यामुळे पोलिसांनी या संपूर्ण परिसरात घेराबंदी केली आहे. सोबतच लोकांना सर्तक राहण्यास सांगितलं आहे.
बाईक रॅलीवेळी झालेली झडप
पोलिसांनी लोकांना कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका असं सांगितलं आहे. त्याशिवाय मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. याआधी नाशिकमध्ये हिंदू संघटनेच्या बाईक रॅलीवेळी दोन्ही समूहांमध्ये झडप झाली होती. त्यावेळी या भागात तणाव निर्माण झाला होता.
